Home विदर्भ राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

230

प्रतिनिधी – धनराज खर्चान

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दौऱ्याची सुरवात अमरावती येथून केली.गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतीची पाहणी करून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शम्भू या गावात पाहणी केली नंतर वलगाव त्यानंतर खारतळेगांव या गावी त्यांनी १८ जुलै ला या गावातील नाल्याला आलेल्या पुरात बुडून मूत्यु पावलेल्या प्रवीण गुडघे व निरंजन गुडघे यांच्या कुटूंबाना सांत्वन भेट दिली व सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले.यावेळी अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर तसेच जिल्हातील शिवसेना शाखा प्रमुख व तालुका प्रमुख हजर होते.