Home विदर्भ अकोला बाजार येथे रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण

अकोला बाजार येथे रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण

185

यवतमाळ / अकोला बाजार – अकोला बाजार येथील मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर स्वच्छता अभियान राबवुन वृक्षारोपण करण्यात आले . या सिमेंट रस्त्यावरील दुभाजकावर परिसरातील कचरा जमा होऊन घाण पसरत होती. त्याठिकाणी स्वच्छता करून सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.

याकरीता सामाजिक कार्यकर्ते योगेश वर्मा , गजानन कडुकार, हमीदखाॅ पठाण, राजु मादेशवार , विजय कडु यांनी पुढाकार घेत वृक्षारोपणाचे कार्य हाती घेतले. सरपंच योगेश राजुरकर , मोहनलाल वर्मा , डाॅ.प्रशांत केळकर , संजय कन्नावार , अजय जगताप , राजेश मनक्षे , बालु उपलेंचवार, भंडारा येथील शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला नरेश कोल्हे (टेकाळे ) , संजय शिंदे पाटील , श्रावण वाघाडे , योगेश जाचक, किशोर छापेकर , विठ्ठल वाघाडे , कुणाल कराळे , प्रभु बंडीवार, रवी घनकर , रमेश रामटेके , गणेश नन्नवरे ,गोलु नांगलीया , बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखा व्यवस्थापक , जगदीश पुरोहित , डाॅ.भुमकाळे, डाॅ. मुजुमदार, डाॅ. नरेंद्र सपाट, मनोज चांडक, पांडुरंग कराळे , शेख मन्नान, सचिन पांपट्टीवार , चंद्रकांत नांगलीया , इसराईल पठाण , विजय राठोड, जागेश्वर पवार, बंटी ठाकरे , शंकर छापेकर, जितेंद्र घनकर , निखाडे काकु , शेख इसराईल यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या रस्त्यावरील लावलेल्या या वृक्षांची देखभाल व संगोपन करण्याची जबाबदारी येथील सर्व व्यापारी बंधूंनी स्विकारली आहे . सौंदर्यीकरण झालेल्या रस्त्याची नागरिकांनी निगा राखावी असे यावेळी करण्यात आले.