Home राष्ट्रीय महाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे...

महाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड

569

प्रतिनिधी-: धनराज खर्चान

भातकुली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वंडली ग्रामपंचायत येथे आज दि.२७ जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ एकर ई क्लास जागेवर ३ हजार वृक्ष लागवड करून सरपंच तथा शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच महाराष्ट राज्य सरपंच संघटना सचिव ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला.तालुक्यातील हा एवढा मोठा वृक्षरोपण कार्यक्रम एक मिसाल आहे.असे मत भातकुली बीडीओ साहेब यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उदघाटन भातकुली पंचायत समिती बीडीओ काळे साहेब तसेच विस्तार अधिकारी तेलंग साहेब यांच्या प्रमुख उपस्थित झाले या वेळी कैलासभाऊ अवघड,शेखर जामनेकर ग्राम पंचायत सदस्य, धर्मपाल वंजारी ग्रा.प.सदस्य गणेश घुसे रोजगार सेवक , डॉ .संतोषभाऊ संके इतर मान्यवर उपस्थित होते.