गावात खळबळ
सरपंच अपाञ होणार?
देवानंद जाधव – विशेष प्रतिनिधी
यवतमाळ – आर्णि तालुक्यातील महाळुंगी ग्राम पंचायत विवाद मामला विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात सुरू आहे. सरपंच, सोनल धनराज राठोड, आणि ग्रा. पं. सदस्य बाली संजय राठोड ह्या आप आपल्या संयुक्त कुटूंबामध्ये राहतात. पण त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी,शिरपूर बिट कक्ष क्र.३२० आणि सर्व्ह नं १० मध्ये वनजमिनीवर अतिक्रमण करुन पक्की घरे बांधुन वस्ती निर्माण केली आहे. ते गैर कायदेशीर आहे. सरपंच सोनल राठोड ह्या शेषराव देवीदास राठोड यांची सुन आहे. आर्णि ऊत्तर वनपरीक्षेञाने अतिक्रमण धारकांची जी यादी जारी केली, त्यामध्ये क्रमांक १२ वर शेषराव राठोड यांचे नावे ४४० चौरस मिटर अतिक्रमण क्षेञ वन विभागाने स्पष्टपणे दाखवले आहे. शिवाय ग्रा. पं सदस्य बालीसंजय राठोड ह्या वनजमिनीवर अतिक्रमण करुन पक्के घर बांधणा-या धनराज लोभा राठोड यांची वहीनी आहे. धनराज यांचे वन विभागाच्या यादी मध्ये क्र.१ वर नाव नमुद असुन, त्यांनी ३५२ चौरस मिटर वनक्षेञावर अतिक्रमण केले आहे. या गंभीर प्रकरणी वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंह नाईक यांनी, विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज) नुसार याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली असुन, सबंधीत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि विशेषतः ऊत्तर आर्णि वनपरीक्षेञ अधीकारी ,क्षेञ सहाय्यक यांना नुकत्याच नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे वनविभाग, ग्राम पंचायत पदाधिकारी आणि महाळुंगी या गावात खळबळ माजली आहे.
ग्राम पंचायत सरपंच, ऊपसरपंच, सदस्य यांनी एक ईंच जमिनीवर अतिक्रमण केल्यास सबंधीतांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करुन, त्यांची पदे रिक्त करण्याच्या सुचना सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या ग्राम विकास मंञालयाने जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. त्यामुळे सरपंच सोनल राठोड, आणि सदस्य बाली संजय राठोड यांचे पद खारीज करुन त्यांचेवर फौजदारी कारवाई होण्याचे संकेत आहेत.तुर्तास महाळुंगी गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. आणि ग्रामस्थांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.