रावेर (शरीफ शेख)
मराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुमित जानकीराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब जाधव यांच्या मान्यतेन धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केली. सुमित पाटील हे गौरी उद्योग समूह व खान्देश कुणबी पाटील वधू-वर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी सहकारी आणि समाजबांधवांच्या सहकार्याने असंख्य लग्न जुळविले. अनेक वादग्रस्त दांपत्याचे मनोमिलन करुन त्यांचा संसार पुन्हा फुलविला आहे. विधवांचे पुनर्विवाह, घटस्फोटांचे लग्न जुळविणे आदी कार्य उल्लेखनीय आहे. कोरोनाच्या काळात गरीब, गरजूंना शक्य ती मदत केली. तसेच ते समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा बंद करुन आधुनिकतेची कास धरण्यासाठी जनजागृती करीत आहेत. ते मराठा समाजातील पोटजातींच्या एकत्रिकरणावरही भर देत आहे. या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती झाली आहे.