ले आउट विकासकांच्या संगनमताने हिवरा ग्राम पंचायत चा मनमानी कारभार
यवतमाळ – हस्तांतरीत न केलेल्या ले लेआऊटमध्ये विकास कामे करून शासनाच्या निधीचा अपव्यय केला असुन या कामाची बिले अदा करण्यात येवु नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)मध्ये लेआऊट निर्मिती करून यामध्ये सोयी सुविधांच्या नावावर प्लॉट धारकांकडून भक्कम पैसे घेतले गेले परंतु या लेआऊटमध्ये साधा रस्ता सुद्धा बनविला नसल्याने या अगोदर ग्राम पंचायत वर सत्ता असणाऱ्यांनी या विकासकांना लेआऊटमधील नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या त्यांनंतर ले आउट ग्राम पंचायत ला हस्तांतरित करण्यात येईल असे सांगितले परंतु विकासकांनी कोणतीही सुविधा या रहिवाशाना दिली नाही.काही महिन्या अगोदर ग्राम पंचायत मध्ये सत्तांतर झाले त्यामुळे या विकासकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून या लेआऊटमध्ये रस्त्यावर मुरूम टाकणे,नाले सफाई,तण नाशक फवारणी करून घेतली यासर्व कामांमध्ये ग्राम पंचायत चा निधी वापरण्यात आला गोरगरीब जनता आपल्या घामाचा पैसा गावचा विकास झाला पाहिजे म्हणुन ग्राम पंचायत ला टॅक्स भरते परंतु ग्राम पंचायत पदाधिकारी मनमानी करून हा कर रूपी सामान्य निधी गरज असलेल्या ठिकाणी खर्च न करता इतर ठिकाणी खर्च करून अपव्यय करीत असल्याने याची चौकशी करून या लेआऊटमध्ये करण्यात आलेल्या कामांची बिले काढण्यात येवु नये अशी मागणी हिवरा येथील रहिवासी ,माहिती अधिकार कार्यकर्ते राम जाधव यांनी महागावचे गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड यांच्याकडे केली आहे.