Home विदर्भ गवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न

गवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न

132

यवतमाळ – येथील अंजनिय सोसायटी आर्णी रोड येथे गवार्ले हॉस्पीटलच्या वतीने यवतमाळ शहरातील स्त्रीयांसाठी मोफत हेल्थ चेकअप कॅम्प चे आयोजन आज दि. 29 जुलै रोजी संपन्न झाले. या शिबीरामध्ये रक्त तपासणी होमोग्लोबीन, एनीमिया डिटेक्शन करण्यासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

शिबीराच्या उद्घाटना प्रसंगी उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या माजी सदस्या ताराबाई गवार्ले यांनी दीप प्रज्वलन करुन शिबीराचे उद्घाटन केले. या प्रसंगी लॉयन्स क्लबच्या अध्यक्षा निलीमा मंत्री, भाजपा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा व अस्तीत्व फाऊंडेशनच्या सचिव डॉ. कविता बोरकर, लायनेसच्या अध्यक्षा अरुणा खोरिया, वाधवाणी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या मनिषा किटुकले, लायनेसच्या माजी अध्यक्षा शिवाणी पालडीवाल, डॉ. मंगला निकम आवर्जून उपस्थित होत्या. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल स्कुल ऍन्ड अचीवर्सच्या संचालिका सौ. वर्षा मानवतकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल शाल श्रीफळ व समान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या शिबीरामध्ये डॉ. अनिल वि. चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाधवाणी फार्मसी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबीरामध्ये सुप्रसिद्ध डॉ. सौ. अंजली गवार्ले यांनी महिलांची तपासणी करुन औषधोपचार केले. या शिबीरा करिता सौ. वर्षा चौधरी, सौ. रोहिणी ढोले, डॉ. विद्या नागपुरे, डॉ. हर्षा साव, डॉ. नेहा जयवंत, डॉ. भारती काकडे,डॉ. शिल्पा गावंडे, रुपाली चव्हाण,सायली गावंडे,सौ.डॉ. शिल्पा गावंडे, रुपाली चव्हाण, सायली गावंडे, सौ. अर्चना शर्मा आदिंनी आवर्जुन उपस्थित राहून शिबीराची शोभा वाढविली.शिबीराच्या यशस्वीतेसाठी गवार्ले हॉस्पीटल मधील कर्मचारी दिव्या जांभुळकर, प्रियंका मुजमुले, अनुराधा वरठ्ठी, आचल डोंगरे, खुशबू टेकाम, सुनिता टेकाम, छाया गजभिये आदिंनी अथक परिश्रम घेतले. या शिबीराच्या आयोजनाबाबत महिला रुग्णांनी समाधान व्यक्त करुन गवार्ले हॉस्पीटल मध्ये असे उपक्रम नियमितपणे राबवावे असे आवाहन केले. प्रस्तावना डॉ. कविता बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. वर्षा चौधरी यांनी केले.