Home मराठवाडा रोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला...

रोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश

573

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – अंबड व घनसावंगी तालुक्यातील रहदारी तसेच शेतकरी व्यापारी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा रोहिलागड, किनगाव ते पारनेर राज्यमार्ग २२ रस्ता असून हा रस्ता सोलापूर – धुळे ,जालना- वडीगोद्री व राजुर- पैठण या महामार्गाला जोडण्याचे काम हा रस्ता करतो. जिल्ह्यातील प्रसिद्ध असे मत्स्योदरी देवी संस्थान, जाबुवंत गड या देवस्थानच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या रस्त्याने येत असतात. त्यांच्या रहदारीची उत्तम सुविधा या रस्त्यामुळे झाली आहे.परंतु गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती व रस्ताही फक्त ३.५ मी.इतका रुंदीचा व अरुंद होता.त्यामुळे राञी प्रवास करतांना रस्ता दिसत नव्हता.सोबत दोन वाहने चलतांनाही मोठी कसरत करावी लागत होती.या रस्त्यावर सतत अपघात घडत होते.यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.तसेच खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी धारकांना मणक्याचे आजार जडले.या रस्त्याने औरंगाबाद,जालना,अंबड,घनसावंगी इत्यादी ठिकाणी जातांना मोठा वेळ खर्च करावा लागत होता.त्यामुळे वेळ आणि आर्थिक असे दुहेरी नुकसान शेतकरी,व्यापारी व प्रवाशी यांना भोगावे लागत होते.

याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भिमराव डोंगरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्याकडे सातत्याने या रस्त्याबाबत पाठपुरावा केला व या रस्त्याचे महत्त्व पटवून दिले.त्यामुळे ना.चव्हाण यांनी सदरील रोडचे दुपदरीकरण व डांबरीकरण करण्यास शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे.या रस्त्याचे दुहेरीकरण करुन डांबरीकरण करणे या कामाचे आदेश मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांना बुधवार(दि-२८)रोजी देण्यात आले आहे.यासाठी पंधरा कोटी रुपये इतका निधीही मंजूर करण्यात आला आहे.
रस्त्याच्या दुपदरीकरण व डांबरीकरणामुळे शेतकरी व व्यापारी यांना आपल्या मालाची जिल्हास्तरावर ने-आण करण्यास मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना ग्रामीण भागातून अंबड , घनसावंगी, जालना, औरंगाबाद इत्यादी मोठ्या शहरात जाण्यासाठी या रस्त्यामुळे मोठा फायदा होणार आहे.तसेच घनसावंगी व अंबड तालुक्यातील जनतेस औरंगाबाद शहर जवळ होणार आहे.
शेतकरी,व्यापारी व विद्यार्थी यांच्यादृष्टीने महत्वाच्या अशा या रस्त्यास शासनाच्या वतीने दुपदरीकरण व डांबरीकरणास मजुरी दिली या बद्दल श्री डोंगरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले.