Home परभणी पालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण...

पालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

783

पालम/प्रतीनीधी

पालम तालुक्यातील पंचायत समिती मधील रोजगार हमी व इतर सामाजिक कामाचा सामाजिक अंकेक्षण तपासणी कार्यक्रम पार पडला असताना,यामध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आढळून आल्याचं निदर्शनास येत असल्याने, सदर सामाजिक अंकेक्षण कार्यक्रमाचे कर्मचारी व एमआरईजीएस मधील टी एस पी, घरकुलाचे इंजिनियर यांच्यामध्ये संगनमत करून, झालेल्या तफावती मध्ये पडदा टाकण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसून येत आहे.सदर प्रकार थोडक्यात असा प्रकार निदर्शनास आला आहे की, रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचारी यांनी गावातील ठळक दलालाला हातात पकडून, लाभार्थ्यांना थेट संपर्क साधून मन माने मार्कआउट देऊन व वाटेल तसे वाटेल त्या ठिकाणी कामे करण्यास परवानग्या दिल्या, परंतु या कामावर मार्कऔट घेताना ग्रामपंचायत, ग्रामसेवक, यांना कसलीही माहिती न देता, या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वतःचां मनमानी कारभार करून, तालुक्यात अनेक कामांमध्ये तफावती निर्माण केल्या आहेत. उदाहनार्थ सिंचन विहीर, काम पूर्ण झाल्यानंतर, मोजमाप पुस्तिकेच्या साप्ताहिक नोंदी घेतल्या जात आहेत, बरेच घरकुले जुन्या बांधकामावर बिले काढने व मुळ नोट कॅम नोंद टाळून इतर ठिकाणी बांधकाम करणे, अशा अनेक प्रकारच्या तफावती, सामाजिक अंकेक्षण मध्ये उघडकीस आल्याचं दिसून आल्या, परंतु हा सर्व प्रकार गुपित ठेवून, ग्राम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना काम देण्या ऐवजी, शासनाच्या नियमाला फाटा देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना खोटे मार्गदर्शन करून लुटत असल्याचा प्रकार दिसून येत आहे,

तरी वरिष्ठांनी पुनर्तपासणी लावून नोट क्याम फोटोच निदर्शनं करून, व प्रस्तावात दिलेल्या नोट कॅम्प फोटोचा व काम चालू केलेल्या ठिकाणाच्या नोट कॅम्प फोटोचा व मार्क आउट देतेवेळी सरपंच,ग्रामसेवक सोबत असलेल्या नोट कॅम्प फोटोचा, परिपूर्ण तपशील तपासून पहावा, असं असताना सामाजिक अंकक्षण करूनही या प्रकारा बाबत कांहीच होत नाही, म्हणजे कार्यालयीन कर्मचाऱ्याची गटविकास अधिकारी,व इतर सर्वांची मिलीभगत झाल्याची,
व रोजगार हमी योजना या कायद्याची पायमल्ली करून शासनाची फसवणूक केल्या जात असल्याने, सदर झालेल्या सामाजिक अंकक्षणाची पुनर्तपासणी करून वर नमूद केलेल्या नियमाची चौकशी करून सदर कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही कारा, अन्यथा आंदोलन, केले जातील, व वेळ पडली तर, कार्यालयाला कुलप ठोकण्याची पाळी येईल, याची वरिष्ठांनी नोंद घ्यावी अशा मागणीचे निवेदन एम.आय.एम पक्षाच्या पालम शाखेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व पालम तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.या वेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( A.I.M.I.M ) पक्षाचे पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनीस अब्दुल लतीफ खुरेशी,हक्काणी खान पठाण,सादात पठाण,शाहबोद्दीन भाई,अनवर पठाण,इमदाद पठाण,फेरोज खुरेशी सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते‌.