Home विदर्भ ४० वर्षिय महिलेची गळफास लावून आत्महत्या….!

४० वर्षिय महिलेची गळफास लावून आत्महत्या….!

231

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती – भातकुली शुक्रवार दि. ३०-७-२१ रोजी दुपारी १२ च्या सुमारास भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हरताळा येथे घडली. सदर महीलेचे नाव मानंदा सुनील मानकर वय ४० वर्ष मृत महीला हि दहा वर्षा आधी सुनील मानकर याला घटस्पोट देऊन तिच्या मुलिसह माहेरी हरताळा येथे राहायला आली होती. तिला हरताळा इथल्या नागरीकांनी स्वताचे घरकुल शासनाकडून मिळवून दिले. मृत महीला व तिची मुलगी या दोघी राहायच्या सदर महीला हि दिवसभर शेतमजूरी करून सांभाळ करायची. गेल्या काही दिवसांपासून महीला हि आजारी असल्याचे समजले. सदर महिलेची मुलगी सकाळी शाळेत भातकुली आली असता मृत महिलेचा मुलीला फोन आला मुलीने सांगितले मि निघाली घरी यायला तेवढयातच महिलेने आपला काळ रचला व स्वताला गळफास लावून आपली जिवन यात्रा संपविली. संपूर्ण परिवारावर दुखाचे डोंगर पसरले. तसेच भातकुली पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता बाॅडी ग्रामीण रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आली. सदर महिलेची मुलगी ही १४ वर्षाची असुन आई सुद्धा नसल्याने तिच्यावर ही संकटाची वेळ आल्याने संपूर्ण परिवाराला सरकार कडे मागणी आहे. मृत महीलेच्या मुलीला मदत करावी. अशी मागणी परिवाराने केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास भातकुली पोलीस करत आहे..