Home विदर्भ महसुल हा शासनाचा कणा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

महसुल हा शासनाचा कणा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

694
रक्त दान करताना यवतमाळ तहसीलदार कुणाल झाल्टे

यवतमाळ  – आज दिनांक ०१/०८/२०२१ महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय यवतमाळ येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले . या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी श्री . अमोल येडगे यांच्या हस्ते झाले , यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले कि , महसूल दिनाची सुरुवात ०१ ऑगष्ट ला हून संपूर्ण महसुली कामे , जबाबदारी , पिकपाहणी , विविध महसुली नमुने हे अद्यावत करून प्रारंभ करण्यात येते यामध्ये जनतेचा महसूल प्रशासनाच्या प्रती असलेला विश्वास कि , महसूल अधिकारी यांच्याकडे समस्या सोडविण्याची क्षमता असते . ती आपण सर्वांनी सार्थ करावी अशी अपेक्षा केली जाते . या प्रसंगी तहसिल कार्यालय यवतमाळ चे प्रगणात जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले तसेच लाभार्थी संजय गांधी निराधार योजना , शेतकरी आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण , निवडणूक ओळखपत्र , विविध शैक्षणिक प्रमाणपत्र , राशन कार्डाचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व – हाडे व उपविभागीय अधिकारी यवतमाळ अनिरुद्ध बक्षी होते . यावेळी ३७ रक्तदात्यांनी रक्तदान करून महसूल दिन साजरा केला व वैद्यकीय तपासणी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचा – यांनी करून घेतली . या कार्यक्रमाला श्री . अजय गौरकार , श्री . राजेश कहारे , श्री . राजेश चिंचोरे , श्री . एकनाथ बिजवे , श्रीमती वकीला मस्के , श्रीमती सुनंदा राऊत सर्व नायब तहसिलदार तसेच तलाठी मंडळ अधिकारी , कार्यालयीन कर्मचारी आरोग्य विभाग अधिकारी व सेतू कर्मचारी हजर होते . कार्यक्रमाचे संचलन व आभार तहसिलदार यवतमाळ कुणाल झाल्टे यांनी केले .