Home बुलडाणा तिने बलात्कार केल्याची धमकी दिली अन , विपरितच घडलं , ???

तिने बलात्कार केल्याची धमकी दिली अन , विपरितच घडलं , ???

1332

 

 

रहीम शेख ,

मोताळा , तालुका प्रतिनिधी ,

शेजऱ्यांचे एकमेकांशी भांडण झाले अन , त्या महिलेने आता तुझी बलात्काराची तक्रार करते अशी धमकी त्याला दिली त्या मूळे भीती पोटी एका इसमाने विषारी औषध पिउन आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील गुळभेली येथे घडली असून या बाबत मृतकाच्या भावाने धामणगाव बढे पोलिसात तक्रार दाखल केली आहे ,

या संदर्भात मृतकाच्या भाउ
राजेश भिमराव चव्हाण ,38 . याने दिलेल्या तक्रारी नुसार घराच्या बाजुलाच माझा भाऊ गोपाल ऊर्फ जेता भिमराव चव्हाण हा त्याचे पत्नी व मूलांसह राहतो . आमचे घरासमोरच नंदु उमला चव्हाण हा त्याची पत्नी कविता नंदु चव्हाण हीचे सह राहतो . त्यांचे आमचे काही दिवसापासुन आपसात पटत नाही . यापुर्वि आमचे शेजारी सांडपाणी व रस्त्याचे कारणावरुन मांडण झालेले आहे . परंतु शेजारी पाजारी यांचे मध्यस्थी मुळे आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत येवून रीपोर्ट दिला नाही . दि . २ ९ / ०७ / २०२१ रोजी नंदु उमला चव्हाण याची पत्नी कविता नंदु चव्हाण हिने खरकटे पानी माझ्या अंगणात टाकले या वरुन मी तीला समजाविण्यास गेलो तर तिने मला तिच्या हातातील भगुण्याने मारले नंतर तिचा पती नंदु चव्हाण हा सुध्दा आला व दोघांनी मला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व कपडे फाडले . व तीच आमचे अगोदर पोलीस स्टेशन ला येवुन माझे , माझी पत्नी मंजुळा राजु चव्हाण भाऊ गोपाल भिमराव चव्हाण व त्याची पत्नी ललीता गोपाल चव्हाण यांचे विरुध्द मारहाण केल्याबाबत तक्रार दिली होती . त्यानंतर मी सुध्दा पोलीस स्टेशन ला गेलो व नंदु चव्हाण व त्याची पत्नी कविता हयांचे विरुध्द त्यांनी माला मारहाण केल्या बाबत तक्रार दिली व घरी आलो . त्यानंतर संध्याकाळी ०५/३० वा सुमारास मी माझी पत्नी भाऊ गोपाल त्याची पत्नी असे हजर होतो . मी भाऊ गोपाल अंगनात होतो त्यावेळी नंदु चव्हाण व त्याची पत्नी कविता असे अगोदरचे वादावरुन शिवीगाळ करु लागले . त्यांना मी व माझा भाऊ गोपाल असे समजवित असतांना नंदु चव्हाण याने गावात राहणारा त्याचा साळूभाऊ गणेश देवराव चव्हाण व त्याची पत्नी बेयो गणेश चव्हाण यांना बोलावून घेतले . ते आल्यानंतर चौघांनी आम्हाला शिवीगाळ करु लागले व कविता नंदु चव्हाण व तीची बहीण बेची गणेश चव्हाण हया दोघी धमक्या देवु लागल्या की तुझ्या विरुध्द बलात्काराचा रीपोर्ट देतो . तेव्हा माझा भाऊ गोपाल चव्हाण हा एकदम घाबरुन गेला व मी त्याला घाबरु नको असे मटले . त्यांनतर आम्ही आमचे घरी गेलो . दुसरे दिवशी दिनांक ३०/०७/२०२१ रोजी मी दुपारी ०२/०० सुमारास घरी होतो तेव्हा भाऊ गोपाल हा शेतातुन कामावरुन घरी आला तेव्हा येताना त्याला कविता नंदु चव्हाण व तीची बहीण बेबो गणेश चव्हाण यांनी पुन्हा शिवीगाळ केली . त्या नंतर गोपाल हा रागाने घरुन निघुन गेला त्यानंतर साधारण ०४/१५ बा सुमारास मला गावातील जयपाल कैलास राठोड याच फोन आला की , खामखेड रस्त्यावर गोडबोलेच्या शेताजवळ गोपालने विषारी औषध पिले आहे . म्हणुन मी . गावातील पांडुरंग वाघा राठोड , सुधाकर बाबुराव राठोड असे व इतर लोक गेलो . तर गोपाल याचे तोडातुन फेस येत होता व त्यांचे तोंडाचा विषारी औषधाचा वास येत होता आम्ही लगेच गजानन प्रेमचंद चव्हाण याची गाडी बोलावून मी , जयपाल राठोड , मनोज साहेबराव चव्हाण असे आम्ही त्याला सोबत घेवुन सरकारी दवाखाणा येथे घेवुन गेलो . तेथे उपस्थित डॉक्टरांनी तो मरण पावल्या बाबत सांगीतले . आज दि . ३१/०७/२०२२ रोजी त्याला घरी आणुन त्याचेवर अंत्यविधी केला . भांडण माझे व नंदु चव्हाण व त्याची पत्नी कविता चव्हाण अशांचे होते त्यांनी भाऊ गोपाल याचे विनाकारण तक्रार केल्याने तसेच त्याला बलात्काराची केस करण्याची धमकी दिल्याने त्याने विषारी औषध प्राशन केले व तो मरण पावला त्याचे मृत्युला नंदु उमला चव्हाण त्याची पत्नी कविता नंदु चव्हाण , त्याचा साडभाऊ गणेश देवराव चव्हाण त्याची पत्नी बेबी गणेश चव्हाण हेच कारणीभूत आहे . त्यांचे विरुध्द कार्यवाही व्हावी अशी तक्रार मृतकाच्या भावाने केली असून याचा पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहे ,