Home उत्तर महाराष्ट्र पत्रकार हा समाजाचा आरसा आहे ,  “हे आधी जाणून घ्या…”

पत्रकार हा समाजाचा आरसा आहे ,  “हे आधी जाणून घ्या…”

395

राम खुर्दळ यांजकडून

लोकशाही जशी लोकांनी लोकांसाठी स्थापलेलं राज्य आहे,तशी पत्रकारिता याच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.पत्रकारिता सध्या खूप व्यापक होत असली तरी,या क्षेत्रात सहभागी प्रत्येक पत्रकाराने “आपण जनतेचा आरसा आहोत”हे ठामपणे समजून घ्यावं,सध्या वाटा चुकलेले अनेकजण या क्षेत्रात आल्याने जाणकार,समजदार पत्रकारांपुढं मोठं आव्हान उभे राहिल आहे,समाजानेही आता आपल्या वाटा चुकवू नये,परिस्थिती विदारक असली तरी मेहनती पत्रकारांच्या पाठीशी ठाम राहाव,व आरसा माहीत नसलेल्या व्यक्तींना त्यांची जागा दाखवली पाहिजे,मात्र कोण ह्या फ़दयात पडत असे म्हणून टाळू नका,मुळात पत्रकारितेची कवच कुंडले समजून सांगण्याची वेळ येणं,ही वेळ का आली? याचा अर्थ या क्षेत्रातील प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे.
पत्रकारीता ज्या संकटकाळात सुरू झाली,ज्यांनी प्रतिकूल स्थितीत सुरू केली,ती लोकजागृतीची क्रांती झाली त्या पत्रकारितेला आता कालानुरूप व्यावसायिक स्वरूप आलेय,मात्र यातून कसे तरायचे?ह्या प्रश्नांची उत्तरे तुमचं सच्चे मन तुम्हाला देईल,
मात्र काळ बदलल्याचे सांगत कर्तव्य विसरू नका,आपण कोणाचे भाट झालो?याचे चिंतन करा,ज्या सामाजिक मुद्द्यांची सोडवणूक,लोकास्थे च्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण निर्भयपणे,व परखडपणे पत्रकारिता करावी यासाठी आपली म्हणजे पत्रकारितेची निर्मिती उदय झाला आहे,याचे भान कोण्ही विसरू नका,जो समाजाचा आरसा असलेली पत्रकारिता त्याव्यतिरिक्त अन्य घटकांच्या दावणीला बांधीत असेल तर त्यातून तुमचे प्रतिबिंब समाजाला दिसत असते,वरवर कौतुक होते मात्र मागून शाप मिळतात हे ध्यानात घ्यावं लागतं,म्हणून आपण बदलत्या पत्रकारितेत जरी जाहिरातीसाठी त्या व्यक्तीचे लांगूनचालणं करू नका,कोणाच्या ओझ्याखाली दबत स्वतःला विकू नका,मात्र अनेक जण कोणाचे झाले?हे ज्याने त्याने जाणावे,व्यावसायिक मूल्य असतात याचा अर्थ असा नाही ते ओलांडून जावे,अहो आपला मार्ग लोकास्थेचा आहे,आणि असला पाहिजे हा आग्रह नाही हीच पत्रकारिता आहे,नाहीतर वाट भरकटत असलेल्या स ,त्यास पत्रकारिता म्हणू नये,अशीच पत्रकारिता सांगते.
पत्रकारितेचे वेगवेगळे स्थर आहेत त्यात सर्वात ज्यास्त अडचणीत धडपडणारा,सक्रिय ग्रामीण,व वस्तीतील पत्रकार ज्याचा पत्रकारितेच्या कामास लागणारा खर्च ही त्यातून निघत नाही,जाहिरातीतून केवळ १५ टक्के त्यात ५ टक्के जीएसटी वजा केल्यास केवळ जाहिरातीसाठी केलेली धावपळ फोन प्रवास यासाठीचाच खर्च त्यातून निघतो,अन सडेतोड सामाजिक आरसा समजून सातत्याने राजकीय,प्रशासकीय,माफिया अश्या अनेकांचे वैरत्व घेणाऱ्या पत्रकारांस कोण्ही उभं करीत नाही,तो कधीतर सामाजिक बहिष्कार व विवंचनेत अडचणीत आपला वसा जपत असतो असे धडपड करणारे कित्येक पत्रकार मी माझ्या ३५ वर्षे पत्रकारितेच्या आयुष्यात पाहिले,त्यांच्या सोबत त्यांना जाणून त्यांच्या प्रति नात बनून माझा माध्यम प्रवास मी करीत आहे,दुसरीकडे मात्र या क्षेत्रात पत्रकारितेची लोकविकासाची जागृतीची,मुद्द्यांना वाचा फोडण्याची कर्तव्य विसरलेला वर्ग या क्षेत्रात आल्याने या लोकांमध्ये मेहनती पत्रकार झाकोळले आहेत,शिंतोडे त्यांच्यावरही उडताहेत.माणूस संगतीने घडतो,तसा पत्रकार हा विचाराने,संस्काराने,मुल्यांची जोपासना करतांना घडतो,त्याचे गुरू अनेक असतात पुस्तके,समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे धुरिणी यांच्या सहवासात पत्रकार घडत असतो.ते संस्कार त्याला मार्ग देतात,तसा तो घडत असतो, आजही पत्रकारिता ही घाट,माथ्यावर,
तळागाळात कार्यरत पत्रकारांच्या माध्यमातून,तसेच या क्षेत्रातील वरिष्ठांच्या मेहनतीने लोकांच्या मुद्द्यांना वाचा फोडते,पत्रकारिते कडे नकारात्मक बघणारे अनेक जण भेटतील मात्र त्यात इमानी कष्टाळू तत्त्वनिष्ठ समाजाचा आरसा म्हणून झटणाऱ्यास कमी लेखू नका,घरावर तुळशीपत्र ठेवून बातमी देणारे व त्याच्या परिणामास रोज सामोरे जाणारे पत्रकार आहेत,मात्र ते दिसण्यासाठी प्रवास भेटी व जाणीव व पत्रकारितेशी प्रामाणिक असावं लागतं,नाहीतर काळ्या चष्म्यातून सगळं काळ दिसत,पारदर्शक चष्मा हवा,
आपला:-राम खुर्दळ,पत्रकार
राज्यउपाध्यक्ष-पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र राज्य,
मो.9423055801