Home बुलडाणा प्रभागातील रस्ता व नालीचे बांधकाम पूर्ण करा नाहीतर रस्त्यावर बसून आंदोलन करू…संदीप...

प्रभागातील रस्ता व नालीचे बांधकाम पूर्ण करा नाहीतर रस्त्यावर बसून आंदोलन करू…संदीप राऊत

256

चार महिन्यापासून रस्त्याची जाणीव करून देऊन ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष

प्रतिनिधी:[रवि आण्णा जाधव]

देऊळगाव राजा:-देऊळगाव मही येथील प्रभाग क्रमांक सहा मधील छत्रपती संभाजी राजे कॉम्प्लेक्स ते रंगनाथ शिंगणे यांच्या घरापर्यंत नाल्याची व रस्त्याची अतिशय दळपत्रि अवस्था झाली आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसात नालीचे पाणी रस्त्यावरन वाहत आहे त्यामुळे येणार जाणाऱ्या लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावर विषारी साप आढळून आले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी आपण जाणीवपूर्वक या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहात असे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठान यांना निवेदनात म्हटले आहे. तरी येत्या पंधरा दिवसात या दयनीय रस्त्याची विल्हेवाट लावावी अन्यथा प्रशासना विरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावर बसून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत यांनी इशारा दिला आहे. यावेळी शिवसेना युवक तालूका उपप्रमुख स्वप्निल शहाणे,किशोर शिंगणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.