इकबाल शेख
आर्वी,दि.३:- २१६ घरकुल लाभार्थ्यांचे पैसे बँक खात्यात का टाकले नाही याचा जाब विचारण्याकरीता गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्याकरीता प्रभारी मुख्याधिकारी आले नाही म्हणुन संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी कक्षातील वस्तुची तोडफोड केली. मंगळवारी (ता.३) हा प्रकार घडला आहे.
गत दिड वर्षा पासुन निधी अभावी घरकुल लाभार्थी लाभा पासुन वंचीत होते. याची दखल घेवुन माजी आमदार अमर काळे यांनी सोमवारी (ता.दोन) नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला होता. यावेळी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक मगर यांनी मंगळवारी (ता.तिन) तिन वाजता पुर्वी २१६ घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ६० हजार रुपयेचा टप्पा आवंटीत केल्या जाईल असे आश्वासन दिले होते. नगर परिषदेने याची संपुर्ण प्रक्रीया पुर्ण केली होती. मात्र नोट शिटवर व धनादेशावर सह्या केल्या नाही. परिणामी लाभधारकाच्या खात्यात पैसे जमा होवुन शकले नाही. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली. संताप वाढला सुमारे ५० ते ६० लोकांचा जत्था नगर परिषेद कार्यालयावर पोहचला. त्यांनी नगराध्यक्ष कक्षचा ताबा घेतला मात्र त्यांचे सोबत चर्चा करण्याकरीता प्रभारी मुख्याधिकारी विनायक मगर हे पोहचले नाही. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली काँग्रेसचे पदाधिकारी अंगद गिरधर यांनी मुख्याधिकारी यांच्या टेबलवरील काचेचे लिखाण टेबल, टेबल बॉक्स, कंपाऊस, कॅल्कुलेटर आदिं जमीनीवर आपटुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.
याची माहिती मिळताच ठाणेदार संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, रणजीत जाधव, अतुल भोयर, पांडुरंग फुगणार, सतिश नंदागवळी, राजु राऊत, मनोज भोंबे, भगवान बवणे आदि तातडीने नगर परिषदेत पोहचले. काँगेसचे कार्यकर्ते नगर परिषदेच्या स्वागत कक्षात नगरपरिषदे विरुध्द घोषणा देत ठाण मांडुन बसले होते. वृत्त लिहे पर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही.
श्रेयवादाचा परिणाम
गत दिड वर्षा पासुन घरकुल लाभार्थी ऊन, पाऊस, वारा याचा सामना करीत रस्याककवर दिवस काढत होते. मात्र या दरम्यान त्यांच्या मदतीकरीता कुणीच पुढे आले नाही. महाराष्ट्र सरकारने निधी पाठवताच काँग्रेस व भाजपा मध्ये श्रेय लाटण्याची होड सुरू झाली असुन यातलाच हा प्रकार आहे असे बोलल्या जात आहे.
तहसीलदार चव्हाण यांनी केली पाहणी
तहसिलदार विध्यासागर चव्हाण यांनी सुध्दा नगर परिषदे मध्ये येवुन येवुन मुख्याधिकारी कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नायब तहसीलदार मगर हे महत्वाच्या कार्यालयीन कामात व्यस्त असल्यामुळे पोहचु शकले नाही अशी माहिती दिली कार्यकर्त्यांनी थोड्या सय्यमाने घ्यायला पाहिजे होते असा सल्ला सुध्दा दिला.