Home महत्वाची बातमी आईस्क्रीम पार्लरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 4 जणांविरुध्द कारवाई..!

आईस्क्रीम पार्लरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 4 जणांविरुध्द कारवाई..!

150

अमीन शाह

बुलडाणा , दि. २२ :- मलकापूर शहरातील अनेक आईस्क्रिम पार्लरमध्ये विद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनींच्या प्रेमाच्या आणाभाका घेण्याबरोबरच व धांगडधिंगाणा करित अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याचे गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्याअनुषंगाने आज मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या दामिनी पथकाने शहरातील माता महाकाली मार्गावरील रंगाई अपार्टमेंट मधील दुर्वांकुर आईस्क्रिम पार्लरवर धाड टाकीत तेथे उपस्थित काही विद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींना पकडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मलकापूर शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून कँफे शॉप व आईस्क्रीम पार्लरला ऊत आला आहे. याठिकाणी अंतर्गत असलेला झगमगाट व आलेल्यांना युवक युवतींना खास बसण्यासाठी करण्यात आलेली विशेष अशी व्यवस्था असल्यामुळे मलकापूर परिसरातील महाविद्यालये , विद्यालये, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी या सेंटरकडे आकर्षीत होऊन त्याठिकाणी आपल्या प्रेम प्रकरणाला व इतर चाळ्यांना वाव देत आहेत.

तसेच मलकापूर पसिरातील अनेक गल्लीबोळांमध्ये सुध्दा दुपारच्या वेळी कोचिंग क्लासेस तसेच कॉलेजच्या तरूण-तरूणींकडून सुनसान जागेचा फायदा उचलीत त्याठिकाणी नको ते चाळे करतांना आढळून आल्याने अनेकांनी या बाबींना आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुध्दा झुडकारून लावण्याचा प्रकार त्यांच्याकडून केल्या जातो. तर कॉफी सेंटरच्या नावाखाली सुध्दा हाच प्रकार शहरामध्ये सुरू असल्याबाबतच्या तक्रारी समोर आल्याने आज मलकापूर शहर पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने शहरातील माता महाकाली मार्गावरील रंगाई अपार्टमेंट मधील दुर्वांकूर आईस्क्रीम पार्लर चे मालक आशिष उर्फ ललित सुरेश डवले यांच्या दुर्वांकुर आईस्क्रिम पार्लरवर टाकलेल्या धाडीत पार्लर मधील वरच्या मजल्यावर अंधारात ३ ते ४ मुल व मुलीं एकांतात आढळून आल्याने त्यांचे विरूध्द दामिनी पथकाकडून 3 जणांविरुध्द मुंबई पोलीस अॅक्ट नुसार कलम 110 , 112 व 117 कारवाई करुन ताब्यात घेतले. तर आईस्क्रीम पार्लर चे मालक आशिष सुरेश डवले यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कलम 33 (1) 131 दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईत दामिनी पथक प्रमुख ज्योती इंगळे , पो. काॅ. पंकज वराडे , चालक चंद्रशेखर यांनी केली , झालेल्या कार्यवाहीमुळे खळबळ उडाली आहे.