Home जळगाव सामस्कावद रोड लगत चे मुस्लिम क़बरिस्थानचे रस्ते वाल कंपाउंड व शुशेभिकरण करा;...

सामस्कावद रोड लगत चे मुस्लिम क़बरिस्थानचे रस्ते वाल कंपाउंड व शुशेभिकरण करा; सावदा मुख्याधिकाऱ्यांकडे मांगणी…

813

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील सावदा शहरातील मस्कावद रोड लगतचे मुस्लिम कब्रस्तान चे वॉल कंपाऊंड सुशोभीकरण करून द्यावे अशा मागणीचे निवेदन सावदा शहरातील मुस्लिम बांधवांनी मुख्यधिकाऱ्यांकडे देऊन तात्काळ काम करून द्यावी अशी मागणी केली.
निवेदनात गेल्या दोन तीन वर्षा पासून नाथाभाउच्या प्रयत्नांमुळे मुस्लिम क़बारिस्थानचे शुशेभिकरण व वाल कंपाउंडचे अनुदान पालिके कड़े आलेले आहे, सदरील अनुदानाचे योग्य नियमानुसार विनियोग लवकरात लवकर करण्यात यावे अशी गावकरांची अपेक्षा आहे.त्याच प्रमाणे काही तांत्रिक अड़चन असेल तर मा जिल्हाअधिकारी सा- जळगाव यांचे मार्गदर्शन घेऊन प्रकरण मार्गी लावण्यात यावे कारण मुस्लिम समाजाची बऱ्याच काळाने क़बरस्थानाची समस्या आहे.तरी ती दूर करता येईल तसेच सदर कामाची निधि आपल्या कड़े उपलब्ध आहे. म्हणून तो निधी त्वरित वापरून काबरस्थान चे सुशोभीकरण व वाल कंपाऊंड करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे
निवेदन देतेवेळी मुतवल्ली अख्तर हाजी साहब व कु. ऊ. बा. संचालक सय्यद असगर ,शे अलीम शे जैनोद्दीन, इलियास खान हामिद खान, अमिन शाह सुलेमान शाह, सय्यद अज़हर सय्यद अख्तर, शे आसिफ शे चाँद कुरैशी, निसार खान गुलाम खान पट्वे, शेख कामील शेख रशीद, शेख नाज़िम शेख शरीफ हे उपस्थित होते.