Home बुलडाणा मलकापुरात दुर्मीळ जातीच्या मांडूळ सापासह एकास अटक..!

मलकापुरात दुर्मीळ जातीच्या मांडूळ सापासह एकास अटक..!

539

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..!

अमीन शाह

बुलढाणा , दि. २२ :- जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या दाताळा शिवारामध्ये जुगार खेळला जात असल्याची मिळालेल्या गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावरून मंगळवारी सायंकाळी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये एका आरोपीसह एक लाख रुपये किमतीचा दोन तोंडी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप,इंग्लिश दारू आणि सात मोटरसायकली सह एकूण ३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि . २१ जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन मलकापुर तालुक्यातील दाताळा येथे जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ व अप्पर पोलीस अधिक्षक खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया ढाकणे यांनी आपल्या पथकासह टाकलेल्या धाडीत एका आरोपीसह दुर्मीळ जातीचा एक जिवंत मांडुळ दोन तोंडी साप किंमत अंदाज़े १ लाख , ५२ ताश पत्ते किंमत अंदाजे ३० रु , नगदी रोख रक्कम २५ ,३०० रु. व मॅकडॉल नं . १ कंपनीचे १८० एम.एल चे ४ नग व इंपेरीयल ब्ल्यु कंपनीचे १८० एम . एल चे ०२ नग असे एकुण ०६ नग कि . १२०० रु विना परवाना दारू विक्री करीता बाळगतांना मिळून आले .

जुगार खेळणाऱ्या इसमांनी घटनास्थळावरुन पळ काढला व त्यांच्या ०९ मोटार सायकल घटनास्थळी निंबादेवी मंदीराचे अलीकडे असलेल्या शेतामध्ये आढळून आल्या . यातील मुख्य आरोपी दिपक रामदास थाटे वय ३६ रा मलकापुर यास सदर गुन्हयात अटक केली असुन जितु राजपुत रा दाताळा , प्रविण भोपळे , प्रविण थाटे हे असुन इतर आरोपीतांचा शोध पोलीस घेत आहेत .

या कार्यवाहीत एकुण ०३ लाख ७८ हजार ६४० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरची कार्यवाही उपविभागीय अधिकारी श्रीमती ढाकणे मॅडम सह त्यांचे पथकातील ए.एस.आय मोहन काचकुरे , ना पो का रजनी तायडे , माधव कुटे , अनंता पाटील , दिपक नाफडे , निता मोरे ,पो काॅ जया ढोले, संतोष चेके , गजानन वाघ., विष्णु निकम , गजानन जाधव हे होते सदर गुन्हयाचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी हे करीत आहेत .