Home जळगाव रावेर येथे वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारणी तर्फे जिल्हा परिषद...

रावेर येथे वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारणी तर्फे जिल्हा परिषद सर्कल व बूथ बांधणी संपर्क अभियान उत्साहात संपन्न

369

रावेर (शेख शरीफ)

रावेर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज सभा गृह रावेर येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महाशय विनोद भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे जिल्हा प्रवक्ता एडवोकेट विनोद भाऊ इंगळे महाराष्ट्र राज्य महिला सदस्य शमीभा ताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग यांनी जिल्हा परिषद गट व प.स.गण या संदर्भात माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे म्हणाले की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी आता पासून तयारीला लागले पाहिजे प्रत्येक गावोगावी वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता जाऊन त्या गावातील मतदारांना वंचित बहुजन आघाडी ची भूमिका पटवून दिली पाहिजे आणि प्रत्येक गावात बूथ बांधणीसाठी एक महिलाव चार पुरुष एकूण पाच व्यक्ती तयार करून मतदान पक्षाला जास्तीत जास्त कसे होईल आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आणता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात विनोद भाऊ सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

रावेर तालुक्याचा आढावा देताना प्रास्ताविकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद सहा गट व पंचायत समिती 12 गणनाची संपूर्ण माहिती देऊन कोणत्या गटामध्ये व गणांमध्ये आपले उमेदवार निवडून येतील हे सुद्धा सांगितले आणि संपूर्ण रावेर तालुका चा आढावा दिला. या बैठकीला तालुका सरचिटणीस कांतीलाल गाढे, तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, तालुका उपाध्यक्ष विनोद तायडे, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, तालुका सचिव अर्जुन वाघ, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, जलील खान, रावेर शहराध्यक्ष अब्बास मनियार , उपाध्यक्ष मोहम्मद शहा, बबलू भाई, इमरान शेख, कंदर सिंग बारेला, कालु बारेला, प्रतीक दामोदरे, अतुल तायडे, गौतम अटकाळे, नितीन अवसरमल, भिमराव तायडे, राहुल तायडे, रोहन तायडे, अजय तायडे, संत्रीबाई बारेला, सयानी बाई बारेला, झुमरी बाई बारेला, शेवंताबाई बारेला, रतलाबाई बारेला, रवीना बाई बारेला, इत्यादी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते महिला पुरुष उपस्थित होते.