Home विदर्भ प्रसायवनात श्रमिक पत्रकार संघाचे वृक्षारोपन…!

प्रसायवनात श्रमिक पत्रकार संघाचे वृक्षारोपन…!

171

अकरा वृक्षांचे स्विकारले पालकत्व

यवतमाळ –  भल्या सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने उठायचे अन् जंगलातील पायवाट तुडवायची. निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी एकरूप होणारा अनुभव आज यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांनी प्रयास वनात घेतला. यावेळी प्रयासच्या समर्पीत कार्यकर्त्यांसमवेत वृक्षारोपणही करण्यात आले.
निसर्गाच्या सहवासात जाण्याचा ट्रेंड आता यवतमाळकरातही रुजतो आहे. यवतमाळात गडकोटांची श्रीमंती नसली तरी घनदाट जंगलांनी व्यापलेल्या डोंगराच्या कुशित मनमुराद आनंद लुटता येईल अशी स्थळे आहे. दैनंदिन जिवनपद्घती अत्यंत धकाकीची झाल्याने श्रमासाठी कुणाकडेही वेळ नाही. त्यात वृत्तपत्रात काम करणाºया वर्गालातर बौद्घीक श्रम अधिक करावे लागतात. यवतमाळात पर्यटनाचे असे कोणतेही विकसीत स्थळ नव्हते. मात्र प्रयास, दिलास संस्था व वनविभागाच्या त्रिपक्षीय करारातून ‘प्रयासवन’ साकारले जात आहे. निसर्गाप्रती समर्पीत भावनेच्या छंदी लोकांनी मिळून गोधनी रोडवरील हे वन पर्यटनाचे जनू केंद्र बनविले आहे. दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करणाºया या बहाद्दरांनी साडेआठ हजार झाडे लावली आहे. सुर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस उगवतो, झाड उगवतात तेव्हा मात्र चांगले दिवस उगवतात ही जाणीव ठेऊन पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी झाड लावण्याचा संकल्प केला आहे. आज रविवारी सकाळी यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघ र.नं. ५७०३ च्या पदाधिकाºयांनी प्रयासवनात भ्रमंती केली. यावेळी दहा झाडे लावण्यात आली. निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रत्येकांनीही प्रयत्न केला. प्रयासच्या प्रत्येक सदस्यांसोबत संवाद साधून आजचा रविवार अविस्मरणीय केला. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप खडेकर, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख, रवींद्र चांदेकर, सचिव अमोल ढोणे, संघटन सचिव नितीन पखाले, सहसचिव राजकुमार भितकर, अमोल शिंदे, कोषाध्यक्ष केशव सवळकर, सदस्य पवन लताड, नितीन उर्फ बल्लु भागवते, राहूल वासनिक, सूरज पाटील, अशोक गोडंबे, अशोक बानोरे, महेमुद नाथानी, सुहास सुपासे, मनोज जयस्वाल, रवी राऊत, कल्पक वाईकर, तसेच पत्रकार संघाच्या सदस्यांच्या परिवारातील पंचफुला भितकर, वंशिका खडेकर, गार्गी पखाले, श्रवण शिंदे, कार्तीकी, समृध्दी सवळकर, प्रियांश ढोणे, अनिकेत व आयुष भागवते आदींची उपस्थिती होती.

अकरा वृक्षांच्या पालकत्वासाठी देणगी
श्रमिक पत्रकार संघांचे अध्यक्ष संदीप खडेकर व संघटन सचिव नितीन पखाले यांनी यावेळी अकरा वृक्षाचे पालकत्व स्विकारत असल्याची घोषणा केली. प्रत्येक वृक्षाची सहयोग राशी एक हजार या प्रमाणे अकरा हजाराची देणगी देण्याचे मान्य केले. प्रयासचे डॉ. कावलकर यांनी सात वर्षापर्यंत या अकरा वृक्षांचे संगोपन केले जाईल असे सांगितले.