अकोला / आलेगाव, दि . ८ प्रतिनिधी – मुस्लिम धर्मीय मस्जितमध्ये चालत असलेल्या नमाज अदा बाबत हिंदू बांधवांना माहिती मिळावी या अनुषंगाने येथील जामा मस्जित पंच मंडळ व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थिती मध्ये मस्जित परिचय कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने दि ७ रोजी पार पडला.
आपला देश विविध धर्म पंथाने नटलेला देश आहे.आणि सांप्रदायिक सदभावना जोपासण्यासाठी सर्व धर्माची माहिती प्रत्तेक धर्मियांना असणे आवश्यक आहे.तसेच राष्ट्रीय एकात्मकता, बंधुता प्रेम व विविध जातींचा सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणून येथील जामा मस्जितचे पंच मंडळ व समस्त मुस्लिम समाजच्या वतीने येथील जामा मस्जित मध्ये मस्जित परिचय आयोजित कार्यक्रमा मध्ये मोहम्मद जफर (शिक्षक) यांनी मस्जितमध्ये नमाज व्यतिरिक्त चुकीच्या अफवांच्या बाजारामुळे मानवामध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले जात आहे.अशा विचाराला आळा बसावा या अनुषंगाने मस्जित मध्ये नमाज कशी अदा केली जाते या बाबत मार्गदर्शन केले. तसेच शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थिती मध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.बिलाला भाई यांनी भगवतगीतेतील श्लोक,ज्ञानेश्वरीतील ज्ञानावर भर देत कुराणामध्ये कसे साम्य आहे ते पटवून दिले.आपण सर्व अल्ला, परमेश्वराची लेकरं आहोत.म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकाला मदत करून भाईचाऱ्याचे जीवन जगणे ह्यातच धर्मासह देशहित आहे.असे सांगितले.या वेळी अक्षयानंद महाराज यांनी मस्जित परिचय कार्यक्रमाची स्तुती करन हिंदू मुस्लिम एकता देश अखंडते करिता महत्वाचे असल्याचे म्हटले.या वेळी सरस्वती शंकर महाराज,महावीर महाराज, ह,भ,प विष्णू महाराज सुभाषचंद्र जैन,बाबासाहेब देशमुख,रमण जैन,गोपाल महल्ले व पत्रकार मंडळी सह गावातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम कोरोनाच्या गाईड लाईनचे नियम पाळून शांततेत पार पडला