जालना येथील आरोपीस अटक ,
अमीन शाह
बुलडाणा ,
शहरातील त्रिश्रण चौक संगम तलाव जवळील स्मशानभूमी परिसरात आपल्या माहेरी आलेल्या एका २७ वर्षीय विवाहितेचा तिच्या नवऱ्याने चाकुने भोककून खून केल्याची धक्कादायक घटना आज बुलढाणा शहरात घडली आहे.
या बाबत अधिक वृत असे कि,सदर दुदैवी महिलेचे नावं सौ. गीता गजानन जाधव असल्याचे वृत्त आहे. तिचे सासर जालना असुन रात्री तिचा पती गजानन जाधव रा , जालना हा बुलढाण्यात आलेला होता. दरम्यान आज ९ आगष्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजेदरम्यान तिचे पती सोबत काही कारणावरून भांडण झाले बोलण्यात बोलण्यात भांडण वाढले व संतापाच्या भरात पतिने हातातील चाकूने पत्नीवर सपासप वार करून तिला भोकसले.
सदर कृत्य करून त्याने आपल्या दोन मुली श्रृती व श्रेया यांना सोबत घेऊन त्याच परीसरातील संगम तलावात मुलीसह आत्महत्या करण्यासाठी तलावात ऊडी मारली ही बाब स्थानिक नागरीकांच्या लक्षात येताच लोकांनी त्या २ चिमुकल्या मुलीसह त्याला सुरक्षीतरीत्या बाहेर काढले
दरम्यान चाकुचे घाव जिव्हारी लागुन जखमी झालेल्या अवस्थेत पूजाला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु काही वेळातच तिने अखेर चा श्वास घेतला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे , त्याने आपल्या पत्नीस का मारले याचा शोध पोलीस विभाग घेत आहे त्याने संशयातून पत्नीस मारले अशी चर्चा घटना स्थळी सुरू होती ,