मनिष गुडधे
अमरावती – डॉ.सुनील देशमुख यांचे संकल्पनेतून 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त अमरावती शहर काँग्रेस कमिटी द्वारे शहराध्यक्ष बबलू शेखावत , माजी महापौर विलास इंगोले यांचे परिश्रमाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देऊन बलिदान दिलेल्या शहिदांच्या पावन स्मृतीस शहीद स्मारक नेहरू मैदान येथे अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नेहरू मैदान, महात्मा गांधी पुतळा, जयस्तंभ, राजकमल असे भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सामील झालेल्या सर्व काँग्रेस जनांचा, नागरिकांचा,महिलांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगता होता. महात्मा गांधीनी 8 ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील काँग्रेसच्या अधिवेशनात ‘भारत छोडो’चा नारा दिला. ९ ऑगष्ट १९४२ रोजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आजाद, सरदार वल्लभ भाई पटेल यांसह स्वतंत्र लढ्यातील प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर देशात क्रांतीची ज्वाला उसळली. मुंबई येथे ‘चले जाव’ म्हणत देशवासीयांनी सक्रिय सहभाग घेऊन त्वेषाने सारा देश ढवळून निघाला . त्याची परिणीती संपूर्ण देशात 9 ऑगस्ट संपूर्ण देशवासियानी या आंदोलनात उडी घेतली तोच ऑगस्ट क्रांती दिन.. यादिवसापासून १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळेपर्यंत स्वतंत्र सैनिकांनी क्रांतीची मशाल तेवत ठेवली.
आज या क्रांती दिनानिमित्त राजकमल चौक अमरावती येथून मशाल रॅली काढण्यात आली..
या कार्यक्रमाला प्रामुख्याने पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर , आ.बळवंत वानखडे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते यांनी उपस्थित होऊन सहभाग घेतला.
या ऐतिहासिक दिनी देशाच्या स्वातंत्रासाठी प्राणांचे आणि सर्वस्वाचे बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्रसैनिकांना विनम्र अभिवादन. शतशः नमन.