Home मराठवाडा आशा व गटप्रवर्तकांचा क्रांतीदिनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा

आशा व गटप्रवर्तकांचा क्रांतीदिनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा

218

जालना – लक्ष्मण बिलोरे

देशातील कामगार संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने राज्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.त्यानुसार आशा स्वयंसेविका सह गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे, किमान वेतन सामाजिक सुरक्षा लागू करा,आशांना १८ हजार रुपये आणि गटप्रवर्तक यांना २२हजार रुपये वेतन लागू करा, एप्रिल २०२१ पासून शासनाकडून आशांना २ हजार रुपये, गटप्रवर्तक यांना ३ हजार रुपये थकीत मिळावे,जूलै २१ पासूनचे मानधन वाढीचा आदेश पारित करण्यात यावा, आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे,कोविड टेस्टचे काम देवू नये, स्टेशनरी वगैरे इतर खर्चासाठी वर्षाकाठी ५ हजार रुपये देण्यात यावे, विमा संरक्षण लागू करा,आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना आरोग्य वर्धीनीमध्ये सहभागी करावे.या स्वरूपाच्या मागण्या आहेत या बाबतीत शासनाने गांभीर्याने विचार करावा.निवेदनावर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक युनियनच्या कोल्हापुर जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, संगिता पाटील,उज्वला पाटील यांच्यासह सुरया तेरदाळे,वसुधा बुडके,ज्योती तावरे, अमृता भोसले, पुजा लाड,निता काशिद यांच्या सह्या आहेत.