Home महत्वाची बातमी संगणक शिक्षकांसाठी आमदार विनोद निकोले यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन…

संगणक शिक्षकांसाठी आमदार विनोद निकोले यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन…

230

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मध्यस्थी करणार का ?

पालघर , दि. २३ :- ( विशेष प्रतिनिधी ) – अनुभवी संगणक शिक्षकांची कायम नियुक्ती झाली पाहिजे व डहाणू प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील रिक्त पदांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावे म्हणून माकप चे 128 डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड. विनोद निकोले यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.

यावेळी कॉम्रेड. निकोले म्हणाले की, संगणक शिक्षक म्हणून गेल्या 08 ते 09 वर्षांपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेत इयत्ता 05 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्प मानधनावर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते. दि. 09 जुलै 2018 च्या शासन परिपत्रका मधील जाचक अटी मुळे पूर्वी काम करत असलेल्या शिक्षकांना डावलण्यात आले. त्यानुषंगाने आमची मागणी अशी आहे की, त्या परिपत्रकातील शैक्षणिक पात्रत्रेत शिथिलता आणून या अनुभवी संगणक शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेऊन तसेच शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासाठी 04 ते 05 वर्षाचा कालावधी देण्यात यावा. या 24 स्थानिक आदिवासी शिक्षकांना डावलून नवीन 57 पदाची संगणक शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत शासन दरबारी वेळोवेळी लेखी पत्र, निवेदन व उपोषण या लोकशाही मार्गाने पाठपुरावा करूनही आदिवासी विकास विभाग या जिल्ह्यातील स्थानिक अनुभवी शिक्षकांना डावलले जात आहे. याबाबत लेखी पत्र जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना देऊन अनुभवी शिक्षकांचा विचार करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र डहाणू प्रकल्प अधिकारी यांच्या मुजोरी पणा मुळे अनुभवी शिक्षकांचा विचार न करता परस्पर शिक्षकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे संगणक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जोपर्यंत या शिक्षकांचा व पालघर जिल्हयातील स्थानिकांचा नोकर भरतीत विचार केला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असा इशारा आमदार निकोले यांनी दिला आहे. तर डहाणू तालुक्यातील डहाणू प्रकल्प मध्ये स्थानिकांना नोकऱ्या द्या आणि मिळाल्या पाहिजे म्हणून सर्व स्थानिक विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिपाई, बेरोजगार या सर्वांनी या बेमुदत ठिय्या आंदोलन मध्ये सामील व्हावे, कारण हीच संधी आहे नंतर कधी मिळणार नाही म्हणून हे आंदोलन डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांचे नेतृत्वाखाली शुरु असल्याचे चंद्रकांत घोरखाना यांनी सांगितले.

यावेळी आमदार कॉम्रेड. विनोद निकोले, मापक चे कार्यकर्ते कॉ. चंद्रकात घोरखाना, कॉ. अजित धवणे, कॉ. धनेश अक्रे, यांच्या सह 24 संगणक शिक्षक सह नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत.