Home पश्चिम महाराष्ट्र कला , वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने गुंडेवाडी येथे एक दिवसीय ग्रामस्वच्छता अभियान….!

कला , वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने गुंडेवाडी येथे एक दिवसीय ग्रामस्वच्छता अभियान….!

146

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. २३ :- येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुंडेवाडी (मराठा नगर) येथे एक दिवसीय ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत गावातील मुख्य रस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, श्री ज्योतिर्लिंग मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना पाईप लाईनसाठी खोदलेली चारी बुजवण्यात आली. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ असे चालू वर्षीचे ब्रीदवाक्य असून त्याअंतर्गत दत्तक खेडे म्हणून गुंडेवाडी (मराठा नगर) गावाची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये महाविद्यालयातील सुमारे १६० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम टेंबरे, प्रा.शिवशंकर माळी, प्रा. विकास कांबळे, प्रा. श्रीकांत कांबळे, डॉ. लक्ष्मण जठार, डॉ. शौकत सय्यद, प्रा.मनोज डोंगरदिवे, प्रा. कालिदास सरकाळे, प्रा. प्रतीक कांबळे, प्रा. भाग्यश्री फडतरे, प्रा. रोहिणी मगर, सरपंच श्री. दादासो निकम, उपसरपंच संतोष निकम, श्री. भानुदास थोरात, सुरेश निकम, सत्यवान महाडिक, अनिल निकम, जनार्दन निकम आदी मान्यवर उपस्थित होते.