Home मराठवाडा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत श्रीधर कुलकर्णी यांचे यश, पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते...

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत श्रीधर कुलकर्णी यांचे यश, पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सत्कार

128

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

१०० शिक्षक क्लब ऑफ जालना आयोजित शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा,बारसवाडा ता.अंबड येथील श्रीधर यशवंतराव कुलकर्णी यांनी यश संपादन केले.या यशाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात (दि.६) राज्याचे आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यात मानाचा फेटा,ट्राॅफी असे पुरस्काराचे स्वरूप होते.’कोवीड काळातील माझे शैक्षणिक उपक्रम’ या विषयावर निबंध लेखन केले.याप्रसंगी मंचावर आमदार निलेश लंके,आमदार कैलास गोरंट्याल,जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड,उद्योजक सुनिल रायठठ्ठा,कृषिभूषण विजय बोराडे १०० शिक्षक क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष राजेभाऊ मगर या मान्यवरांची उपस्थिती होती.

या यशाबद्दल डोणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश फटाले,मुख्याध्यापक सुभाष चाटे,शालेय समिती अध्यक्ष अशोक घाडगे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जगदीश कुडे,संतोष लिंगायत,बारसवाडा येथील शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.