घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी कुंभार पिंपळगाव आठवडी बाजारात नवीन मुगाची आवक,बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्याचा सत्कार,११ आॅगष्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रथम मुग घेउन आलेले कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी विलास आसाराम कंटूले यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी सुनील साहुजी, प्रेमचंद साहुजी , रामभाऊ कंटुले, भाऊसाहेब शिंदे, बाजार समितीचे केंद्र प्रमुख राहुल गुजर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे घनसावंगी तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, बाजार समिती चे कर्मचारी भाऊसाहेब काळे, दत्ता बिलोरे, परमेश्वर जाधव सह परिसरातील शेतकरी, हमाल मापाडी, मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.