Home जळगाव दिल्ली जंतर मंतर घटनेचा हिंदू मुस्लिम संघटना तर्फे तीव्र निषेध व कडक...

दिल्ली जंतर मंतर घटनेचा हिंदू मुस्लिम संघटना तर्फे तीव्र निषेध व कडक कारवाईची मागणी

145

रावेर ( शेख शरीफ)

दिल्ली येथे ८ ऑगस्ट रोजी भारत जोडो आंदोलन नामक संघटने द्वारा आयोजित कार्यक्रमात उपस्थित राजकीय व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समान नागरी कायदा या बाबत मुस्लिम समुदाया विरुद्ध अपशब्द बोलून संपूर्ण समाजाची विटंबना करून भारतीय संविधानाची पायमल्ली केली त्याबद्दल जळगाव येथील हिंदू-मुस्लीम संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारी यांनी भारताचे मुख्य न्यायाधीश एन वी रमन्ना यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदन दिले असून या निवेदनात ज्या राजकीय व्यक्तींनी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हेट स्पीच ( द्वेष पसरविणारे भाषण) केलेली आहे त्यांच्या विरोधात *देशद्रोहाचा* खटला दाखल करण्यात यावा व त्यासाठी आमचे हेच निवेदन जनहित याचिका म्हणून समजण्यात यावे अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
सदरचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले जळगावकरांच्या भावना मुख्य न्यायाधीश भारत सरकार यांना कळविण्यात येतील असे त्यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

*यांची होती उपस्थिती व निवेदनावर स्वाक्षरी*

मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी चे उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा शिरसाठ, लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष एडवोकेट इमरान शेख ,महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, समाजवादी पार्टी महिला जिल्हाध्यक्ष साजिया इक्बाल, संविधान जागरण समितीचे हरिश्चंद्र सोनवणे, अनवारुल उलूम अरबी मदरसा चे सचिव सय्यद चाँद सय्यद अमीर ,समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहिनुद्दीन, खाटीक बिरादरीचे सुलतान सुलेमान खाटीक, व शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान मजीद खान यांची उपस्थिती होती.