Home महत्वाची बातमी जवाई सासुरवाडीला आलं अन ,लफडच करून टाकलं हो ,???

जवाई सासुरवाडीला आलं अन ,लफडच करून टाकलं हो ,???

1460

 

 

जवायाचा शोध सुरू ,

 

क्राईम स्टोरी , अमीन शाह ,

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरापासून जवळच असणाऱ्या, मंगळापुर शिवारामध्ये चाकोरी या गावातून जावई आणि मुलगी सासु-सासर्‍यांना भेटण्यासाठी आले होते. सासरवाडीत आल्यावर रात्री जावयाचा सासरवाडीमध्ये मोठ्या कौतुकाने पाहुणचार झाला होता. त्या रात्री जावई आपल्या बायकोसह मुक्कामास सासरी थांबले होते.

त्यानंतर रात्रीच्या वेळी जावयाने आपल्या बायकोला झोपेतच माहेरी ठेवले व त्याच रात्री त्याने आपल्या अल्पवयीन लहान मेहुणीला सोबत घेऊन पलायन केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यांमध्ये सासुने आपल्या मोठ्या जावयाच्या विरोधात त्यांच्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यांमध्ये अजय लहानु पवार, राहणार साकुर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावयांने आपल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून, पळवून नेल्याची तक्रार सासूने संगमनेर शहर पोलिस ठाण्यांमध्ये दिली असल्यामुळे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, चौधरी हे करत आहे ,