Home मराठवाडा बँक मॅनेजर नसल्याने शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित, युवासेनेने खुर्चीला हार घालून...

बँक मॅनेजर नसल्याने शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित, युवासेनेने खुर्चीला हार घालून केला निषेध व्यक्त

262

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे


जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत
गेल्या १ महिन्यांपासून व्यवस्थापक पद रिक्त असून यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. सध्या खरीप हंगाम चालू असून शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी पैशाची अत्यंत गरज आहे.शाखाव्यवस्थापक नसल्याने एकही पीक कर्ज प्रकरण पुढे सरकले नाही. याबाबत युवा सेनेने दखल घेतली असून संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी,१७ ऑगष्ट राेजी शिवसेना साेशलमिडीया व युवा सेनेच्या वतिने बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शाखा व्यवस्थापकाच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निवेदन दिले.शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे प्रस्ताव बँकेत धूळ खात पडून आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळणे कठीण झाले आहे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी या शाखेत तात्काळ व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात यावी नसता विभागीय कार्यालया समोर युवासेनेच्यावतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला आहे.या प्रसंगी
शिवसेना कार्यकर्ते संदीप कंटुले ,शिवसेना साेशलमिडीया तालुकाप्रमुख धर्मराज आंधळे,युवासेना उपतालुकाप्रमुख रवि शिंदे,गाेपाल तांगडे,तपाेवन काळे,माउली उंबरे,नितिन आधुडे,कृष्णा शिंदे,शिवाजी माकाेडे,शकुर शेख,अमाेल काळे,अशाेक दराडे सह शिवसेैनिक उपस्थित हाेते.