Home महत्वाची बातमी अफगानिस्तान वरून 129 भारतीयांना सुखरुप आनलेल्या विमानाची एयरहोस्टेज होती दर्यापुरची लेक.

अफगानिस्तान वरून 129 भारतीयांना सुखरुप आनलेल्या विमानाची एयरहोस्टेज होती दर्यापुरची लेक.

184

मनिष गुडधे

अमरावती – तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा (Taliban attack on Afghanistan) मिळविला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्षांनी देखील देश सोडला. तसेच तालिबान्यांच्या भीतीनं अनेक नागरिकांनी देशातून पळ काढला आहे. भारताने देखील आपल्या नागरिकांना आणण्यासाठी विमान पाठवले होते. त्याच विमानातून अमरावतीच्या दर्यापूरच्या लेकीने १२९ भारतीयांना अफगाणिस्तानमधून सुखरूप मायदेशी परत आणले.

अफगाणिस्थानमध्ये अराजकता माजली आहे. देश सोडण्यासाठी जीवाच्या भीतीने अनेक नागरिक विमानतळाकडे धाव घेत आहेत. अनेकांनी विमानावर लटकून प्रवास करण्याचाही प्रयत्न केला. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले. तसेच याठिकाणी गोळीबार देखील झाला होता. इतकी भयंकर परिस्थिती असतानाही अफगाणिस्तानातून भारतीयांना आपल्या मायदेशी सुखरूप आणण्यासाठी दर्यापूरची लेक श्वेता चंद्रकांत शंके हीने आपल्या सहकाऱ्यांसोबत अफगाणिस्तानातील काबूलमध्ये गेली होती. भारतातून पाठविलेल्या विमानात श्वेता ही हवाई सुंदरी म्हणून गेली होती. अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेतले आणि आज १२९ भारतीयांना घेऊन विमान यशस्वीपणे भारतात दाखल झालं. श्वेता ही दर्यापूरमधील बाभळी येथील शिवाजी चौकात राहते. तिचे वडील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तसेच बहीण दर्यापूरमध्ये दंतरोगतज्ज्ञ आहे आणि भाऊ फार्मासिस्ट आहे. सन २०१७-१८ मध्ये तिची निवड हवाई सुंदरीसाठी झाली. प्राथमिक ट्रेनिंग संपल्यावर इंडियन एरलाईन्समध्ये कार्यरत झाली. सध्या ती दिल्ली येथे काम करते.