Home महत्वाची बातमी अफगाणिस्तान मधून 129 भारतीय नागरिक परतले ,

अफगाणिस्तान मधून 129 भारतीय नागरिक परतले ,

407

 

विदर्भ कन्या शवेता ची महत्वाची भूमिका ,

अमीन शाह ,

अफगाणिस्तान चा तालिबानी नि ताबा घेतल्यानंतर तेथून बाहेर पडण्यासाठी लोक जीव धोक्यात घालत आहेत . अनेक जणांनी विमानाला लटकून अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न केला . त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला . काबुल विमानतळाला तर एसटी बसस्टॉपचं स्वरुप प्राप्त झालं . या स्थितीत भारताने अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांना परत आणण्याची मोहीम सुरू केली आहे . या मोहिमेत सामील असलेल्या विदर्भ कन्येच्या धाडसासं सर्वत्र कौतुक होत आहे . भारताकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी विमान पाठविण्यात आले होते . त्याच विमानातून विदर्भातील अमरावतीमधील दर्यापूरच्या लेकीने 129 भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणलं . जीवाच्या भीतीने तेथील लोक मिळेल त्या विमानाने देश सोडण्याच्या तयारीत आहेत . काही जण टेकऑफ करण्यापूर्वी विमानाला लटकले होते . त्यातील काही खाली कोसळून मृत्यूमुखी पडले . याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले . अशा परिस्थितीत विदर्भकन्या दर्यापूर येथील श्वेता चंद्रकांत शंके आपल्या सहकाऱ्यांसोबत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी अफगाणिस्तानातील काबूलमध्ये गेली होती . विशेष म्हणजे राजधानी काबूलवर देखील तालिबानने ताबा मिळवला आहे . इंडियन एअरलाईन्सने पाठवलेल्या विमानात श्वेता हवाईसुंदरी म्हणून गेली होती . काबूलमध्ये अतिशय बिकट परिस्थिती असूनही तेथील भारतीयांना घेऊन विमान भारतात परतलं आहे .यात विदर्भ कन्येचे म्हतवाची भूमिका होती त्या मुळे श्वेता ची अमरावती दर्यापूर मध्ये प्रशन्सा केली जात आहे ,