प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त…!
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ठ कामगीरी…!!रवि माळवी
यवतमाळ , दि. २३ :- नायलॉन मांजा हा पशु, पक्षी तथा मानवा करीता अपायकारक असल्याने महाराष्ट्र शासनाने सन २०१५ चे परिपत्रकानुसार नायलॉन मांजा विक्री व वापरास प्रतिबंध केलेला असतांनासुध्दा हा नायलॉन मांजा पतंग विक्रीच्या दुकानात खुलेआम विक्री केला जात असतांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने दुकानावर छापा टाकून जप्त केला. पोलीसांनी ही कारवाई दिनांक २२ जानेवारी रोजी मारवाडी चौकातील बंटी पतंगवाला ह्या दुकानात केली.
बंटी नंदकिशोरजी अग्रवाल (४२ वर्षे) रा. मारवाडी चौक, यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. आज दिनांक २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे हे त्यांचे पथकासह कार्यालयात हजर असतांना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने सन २०१५ चे परिपत्रकानुसार प्रतिबंधीत असलेला नायलॉन मांजा मारवाडी चौक यवतमाळ येथील बंटी पंतगवाला नावाच्या दुकानदार विक्री करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचकवडे पंचासह तेथे जावून सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता सदर दुकाणामध्ये महाराष्ट्र शासनाने सन २०१५ चे परिपत्रकान्वये प्रतिबंधीत केलेला नॉयलॉन मांजा एकुण ८२ नग प्लास्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेला किंमत ५ हजार ७०० रुपयाचा दुकाणात विक्री करण्याचे उद्देशाने साठवून ठेवून असतांना मिळून आल्याने जप्त करुन दुकाण मालक बंटी अग्रवाल याचे विरुध्द यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करुन कार्यवाही केली.
प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणा:याविरुध्द कार्यवाही करणेबाबत पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी आदेशीत केले वरुन सदरची कार्यवाही करण्यात आली. यादव्दारे जनतेस आवाहन करण्यात येते की, नायलॉन मांजा हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला असल्याने त्याची विक्री व वापरास बंदी असल्यामुळे कोणीही सदर प्रकारचा नायलॉन मांजा विक्री करु नये अथवा पतंग उडविण्याकरीता त्याचा वापर करु नये. नायलॉन मांजा वापरुन पतंग उडविणा:यांविरुध्दही कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याने कोणीही नायलॉन मांजाचा वापर करु नये या करीता आवाहन करण्यात येत आहे.सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नूरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, साहेबराव राठोड, हरीष राऊत, महेश पांडे, सुधीर पिदुरकर, ममता देवतळे, दुर्गा कांबळे सर्व स्थाकिन गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.
नायलॉन मांजा वापरुन पतंग उडविणार्यांविरुध्दही होणार कायदेशीर कार्यवाही
प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त…!