Home जळगाव पत्रकार समाजासाठी आरसा – विलास ताठे

पत्रकार समाजासाठी आरसा – विलास ताठे

127

चिनावल च्या पत्रकारांना पुरस्कारांचे वितरण

रावेर ( शेख शरीफ)

पत्रकार हा नेहमीच समाजासाठी आरश्याचे कार्य करतो समाजातील नकारात्मक बाबी टाळण्यासाठी सकारात्मक लेखणी चालवणारा पत्रकार नेहमीच दुर्लक्षित होतो मात्र पत्रकार हा सुद्धा माणूस आहे व त्यांचे कार्याचा गौरव व्हायला पाहिजे या विचाराने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , मुंबई तालुका रावेर च्या वतीने पत्रकारांना पुरस्कार ही संकल्पना राबविली याच अनुषंगाने आज चिनावल येथील पत्रकार राजेंद्र भारंबे व गिरीश नारखेडे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य मुळे त्यांना पुरस्कार देताना विषेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे यांनी चिनावल येथे केले
आज दिनांक १३ आगस्ट रोजी चिनावल येथील पत्रकार राजेंद्र भारंबे व गिरीश नारखेडे यांना येथील शि.प्र.मडळाच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पुरस्कार वितरण शि.प्र.मडळाचे अध्यक्ष किरण दादा नेमाडे , सेक्रेटरी गोपाळ पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती गोपाळ नेमाडे , मुख्याध्यापक एच आर ठाकरे यांच्या हस्ते ट्रॉफी, पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले
सदर वेळी दोन्ही पत्रकारांनी नेहमीच सकारात्मक पत्रकारिता करून समाजहित जोपासल्याची भावना उपस्थीतानी व्यक्त केली या वेळी चिनावल विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.एम. जावळे , उपशिक्षक एम एस महाजन ,ए.व्ही राणे ,सुराज तडवी , संदीप महाजन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एस महाजन यांनी केले दरम्यान राजेंद्र भारंबे व गिरीश नारखेडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने मिळालेल्या पुरसकारा बदल चिनावल व परिसरात अभिनंदन होत आहे.