नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न.(१) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्हा पोलिस आस्थापन मंडळाच्या शिफारशी नुसार नमुद सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या त्याच्या प्रशासकीय विनंतीवरून प्रभावाने बदल्या / नेमणुक करण्यात आले आहेत.
मागील काही दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ह्या राखडल्या होत्या, परंतु त्या आज दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक मा.प्रमोद कुमार शेवाळे यांनी सहायक पोलीस निरीक्षकांना नवीन जागेवर कार्यभार स्वीकारण्याचे पत्रक दिले आहे._
तरी, संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या खालील ठिकाणे बदल्या नेमणुक झालेले आहेत._
सपोनि महादेव शिवाजी पुरी, यांची कुंटूर पोलिस ठाणे, सपोनि करीमखान सालारखान पठान यांची कुंडलवाडी पोलीस ठाणे, विजय दौलतराव जाधव यांची रामतिर्थ पोलिस ठाणे, नरसिंह राम आनलदास यांची नायगाव पोलिस ठाणे, संकेत वसंतराव दिघे यांची पो.स्टे.नांदेड ग्रामीण येथे, बाळु रघुनाथ गिते यांची नांदेड विमानतळ पो.ठाणे येथे बदली झाली आहे.
तसेच नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक श्री प्रमोदकुमार शेवाळे यांनी या सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना संबंधित नविन बदलीच्या / नेमणुकिच्या ठिकाणी तात्काळ हजर राहुल कार्यभार स्विकारावा व नवीन कार्यभार स्वीकारल्यानंतर तसा अनुपालन अहवाल नांदेड पोलिस मुख्यालयात सादर करण्याचे आदेश नांदेड पोलिस अधिक्षक मा. प्रमोद शेवाळे यांनी संबंधित सर्व स.पो.निरिक्षकांना दिले आहेत.