Home महत्वाची बातमी महोरम उत्सव मध्ये करोना चे नियम तोडणाऱ्या सरपंचा सह 22 जणांवर कारवाई...

महोरम उत्सव मध्ये करोना चे नियम तोडणाऱ्या सरपंचा सह 22 जणांवर कारवाई ,

381

 

 

भगवानराव साळवे ,

सिंदखेड राजा

कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून दि 21रोजी साखरखेरडयात महोरम उत्सव साजरा करण्यात आला मात्र यामध्ये काही जण बिना मास्क महोरम मध्ये सामील झाले होते याची माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी बिना मास्क महोररम मध्ये सामील झालेले सरपंच आयोजक यांच्या सह 22 लोकांवर कारवाई केली याबाबत मिळालेल्या माहिती नुसार साखरखेर्डा येथील जाफराबाद महोल्ल्यात मोहरम उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो मात्र या वर्षी करोना चा धोखा असल्या मुळे हा म्होरम उत्सव जागीच साजरा करण्यात आला परंतू यामध्ये अनेक जण विना मास्क होते याची माहिती मिळतात ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि त्याचे कर्मचारी तातडीने उत्सवाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी बिना मास्क सामील झाले त्या मुळे सरपंच दाऊद सेठ कुरेशी यांच्या सह 22 जणांवर ठाणेदारांनी कारवाई केली आहे.
दरवर्षी साखरखेर्डा शहरातून ही मिरवणूक निघत असते मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मुस्लिम बांधवांनी जागेवरच हा उत्सव साजरा करून शासनाच्या नियमाचे पालन केले.पण यातील काही युवकांनी मास्क चा वापर न केल्यामुळे सरपंचा सह आयोजकांवर कारवाई केल्याची माहिती ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली आहे.