Home वाशिम भाजपाच्या व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षाला शिवसेना कार्यकर्त्याकडुन जिवे मारण्याची धमकी?

भाजपाच्या व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षाला शिवसेना कार्यकर्त्याकडुन जिवे मारण्याची धमकी?

169

मंगरूळपीर येथे अवैध धंदे आणी तांदुळतस्करांची दादागिरी…..

 

अवैध धंदे आणी तांदुळतस्करीची तक्रार केल्यामुळे धमकी दिल्याची माहीती

मंगरुळपीर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

वाशिम:-मंगरूळपीर येथील रहिवाशी असलेले भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील हरिरामजी मालपाणी त्यांच्या दुकान राजेंद्र प्रिंटींग प्रेस येथे येऊन शिवसेना पदाधिकारी यांनी अश्लिल शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दिली आहे.
सुनिल मालपाणी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद असे की, मी राजेंद्र प्रिंटींग प्रेस या माझे दुकानात भाजपा शहर अध्यक्ष शाम खोडे व तालुका अध्यक्ष रविंद्र ठाकरे यांचेसोबत बसलेलो असतांना अंदाजे १२ वाजताचे दरम्यान शिवसेनेचे विवेक नाकाडे, सचिन परळीकर, जुबेर मोहनावाले, सुनिल कुर्वे, जितेंद्र येवले व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते माझे दुकानात आले व मला बोलु लागले की, तु शिवसेनेच्या व अवैध धंद्याच्या विरोधात का बोलतो. यापूर्वीही तु आमच्या अवैध धंद्याची तक्रार केली होती. आमचे धंदे आताही चालु आहेत. यापैकी विवेक नाकाडे याने मला अश्लील शिवीगाळ केली व मला म्हणाला तु बाहेर भेट तुला मी मारुन टाकतो.तर विवेक नाकाडे म्हणाला की वरली मटका, अवैध तांदुळ, खंडणी वसुली हे आमचे धंदे आहेत. आमचे कोणी काही वाकडे करु शकत नाही. त्याने म्हटले की आमचे दोन नंबरचे धंदे कोणीही बंद करु शकत नाही. आम्ही तुझा जिव घेतल्याशिवाय राहणार नाही.अशा आशयाची मंगरुळपीर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे.तसेच दोषींवर कारवाई करावी व माझ्या जिवीताचे काही कमीजास्त झाल्यास विवेक नाकाडे व शिवसेनेचे कार्यकर्ते/ पदाधिकारी जबाबदार राहतील असेही तक्रारीत नमूद आहे.याआधीही अवैध धंद्याविरुध्द दि. २२/२/२०२१ ला दिलेल्या तक्रारीची प्रत मालपाणी यांनी सोबत जोडली आहे आणी घटनेचा सि. सी. टी. व्ही फुटेज मेमरी कार्डसुध्दा पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.