मनिष गुडधे
अमरावती – अंथरुणाला खिळलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोरोनाची लस देण्यासाठी घरोघरी लसीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महापौर चेतन गावंडे व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शहरी आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांच्या घरोघरी जावून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.