Home वाशिम मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे डेंग्युचा ऊद्रेक;ग्रामवाशी हैरान

मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे डेंग्युचा ऊद्रेक;ग्रामवाशी हैरान

324

 

गाव तापाने फणफणतेय,माञ आरोग्य यंञणा सुस्तच

धूरफवारणी करुन घरोघरी रूग्नतपासणी करावी

मंगरूळपीर:-(फुलचंद भगत)-तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे डेंग्यु आजाराने थैमान घातल्यामुळे ग्रामवाशी हैरान झाले आहेत.ग्रामप्रशासनाने धुरफवारणी करुन आरोग्य विभागाकडुन घरोघरी जावून रूग्नतपासणी करावी अशी मागणी गावकर्‍याकडुन होत आहे. संपुर्ण वाशिम जिल्ह्यात डेंग्युसंदृश्य,टायफाईड,मलेरिया आदी आजारांचे रूग्न झपाट्याने वाढत असुन आरोग्य विभागाला याचे काही घेणेदेणे नसल्याचे चिञ आहे परंतु दुसरीकडे माञ खाजगी दवाखानेवाले आणी रक्त तपासणी लॅबवाल्याचे चांगभले होतांना दिसत आहे.अव्वाच्या सव्वा दर आकारुन खाजगी रूग्नालयात गोरगरीबांना ऊपचार घेण्यास भाग पडत आहे.वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी दखल घेवून सरकारी आरोग्य यंञणा रूग्नांसाठी सज्ज ठेवण्याची मागणी होत आहे.
आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पिंपळखुटा संगम येथे प्रशासनाच्या अनास्थेमुळे तसेच गावात पसरलेल्या घाणीमुळे मच्छरांचे प्रमाण वाढुन परिणामी डेंग्यु आजाराने हैदोस घालायला सुरुवात केली आहे.ग्रामवाशी हैरान झाले असुन दवाखान्याच्या चकरा मारुन ञास सहन करत आहेत.वाशिम जिल्हावाशी विविध आजाराच्या तापाने फणफणत असुन सरकारी यंञणा या आजारावर नियंञण मिळवण्यासाठी तोकडी पडत आहे का हा प्रश्न सध्या ऊद्भवत आहे.डेंग्यु,मलेरिया,टायफाईड आणी इतर काही आजाराकरीता रूग्नांना रक्ततपासणीचे सल्ले देत असल्याने सरकारी दवाखान्यात मिळालेल्या गोपनिय माहीतीनूसार एकच किट तीनचार जनांना रक्ततपासणीसाठी वापरत असल्याने तसेच सरकारी दवाखान्यात निवडकच तपासण्या होत असल्यामुळे पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही त्यामुळे साहजीकच रूग्न खाजगी लॅबवाल्याकडे आकर्षित होतात.खाजगी रक्त तपासणीवाले ‘शिकार आली’ या अवीर्भावात अव्वाच्या सव्वा वारेमाप बिल आकारुन रक्त तपासुन देत असल्याची खंत काही रूग्नांनी बोलुन दाखवली.आरोग्यासाठी कोणीही रूग्न पैशाकडे पाहत नसल्याचाच फायदा खाजगी दवाखान्यावाले घेत असल्याने चहुबाजुंनी रूग्नांची पिळवणूक होत आहे.एकीकडे शहरात आणी ग्रामीण भागातही आजाराने आपले पाय पसरल्याने या आजारावर नियंञण मिळवन्याठी धुर फवारणी,घरोघरी रूग्नतपासणी आणी संशयित रूग्नांचे रक्तनमुने घेवुन त्यांना सरकारी इलाज वेळेत मिळवून देणे गरजेचे बनले आहे.आधी ग्रामीण भागात आरोग्यसेवक अशा साथीच्या आजाराच्यावेळी घरोघरी जावुन रूग्नतपासणी करीत होते माञ आता ही मोहीम फक्त कागदावरच राबवली जाते की काय?अशा संशय व्यक्त होत आहे.गावामध्ये प्रत्येक वार्डात धूरफवारणी करून घरोघरी आरोग्य यंञणेने जावुन आरोग्य तपासणी करावी आणी रूग्नांना वेळेत मोफत ऊपचार ऊपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जनतेमधुन होत आहे.

 

ग्रामपंचायतकडुन धुर फवारणीला सुरुवात

पिंपळखुटा ग्रामपंचायतीकडुन धुरफवारणीला सुरुवात केल्याची माहीती मिळाली असुन काही भागात धुरफवारणी झाली आणी नंतर फाॅग मशिन खराब झाली असल्याचे समजले.आरोग्य विभागालाही डेंगु आणी इतर गावात पसरलेल्या आजाराविषयी माहीती दिली असुन लवकरच घरोघरी जावुन रूग्नतपासणी होणार असल्याचे समजले.

 

ग्रामप्रशासन आणी लोकप्रतिनीधीत नसलेल्या समन्वयामुळे ग्रामवाशी हैरान

प्राप्त माहीतीनूसार पिंपळखुटा ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय यंञणा आणी लोकप्रतिनीधी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे लोकांच्या आरोग्यविषयक आणी इतर सुविधांकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.एकीकडे आदर्श गाव म्हणून पिंपळखुटा गावची ख्याती असलेल्या गावातच अच्छततेमुळे आणी प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावात विविध आजाराने डोके वर काढले.यातच डेंगुचा प्रकोप झाल्याने लोक भयभित झाले आहेत.वरिष्ठांनी लक्ष देवून आरोग्यविषय सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206