Home मराठवाडा राष्ट्रीय एकात्मतेची भावना: मुस्लिम युवकाने रक्तदान करून हिंदू महिलेचे वाचवले प्राण

राष्ट्रीय एकात्मतेची भावना: मुस्लिम युवकाने रक्तदान करून हिंदू महिलेचे वाचवले प्राण

596

हारून शेख यांचे अभिमानास्पद कार्य, व्यापारी महासंघाने केला सत्कार

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील एका मुस्लिम बांधवाने भोकरदन येथिल एका मराठा समाजातील महिलेला ऐनवेळी रक्ताची एक पिशवी देऊन समाजात आदर्श निर्माण करुन माणुसकी जपली आहे.
सविस्तर वृत्त असे की,घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील हारून शेख हा युवक आपला मित्र आजारी असल्याने त्याला भेटण्यासाठी जालना येथील उढाण हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळी रुग्णालयाच्या बाहेर भोकरदन येथील एक राजाराम पाटील नावाच्या तरुणाने त्याच्या पत्नीला उढाण हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते, मात्र त्याच्या पत्नीची प्रकृती अत्यंत नाजुक असल्याने तिला बी पॉझिटिव्ह या गटाच्या रक्ताची तातडीने गरज होती. जीवन- मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता.परिस्थिती गंभीर बनली होती.मात्र बी पाॅझिटीव्ह रक्तगट असलेली पिशवी मिळत नसल्याने त्या महिलेचा पती गांगारून गेला होता.कुणाला काय करावे सुचत नव्हते. यावेळी तीथे हजर असलेल्या हारून शेख यांनी विचारपूस केली, सविस्तर अडचण सांगितली. हारूण शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, कुठलाही विचार न करता माझा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि आत्तापर्यंत २८ वेळा रक्तदान केले आहे. मी तुम्हाला रक्तदान करण्यास तयार आहे. त्यावेळी जालना येथिल श्री स्वामी समर्थ रक्तपेढीत जाऊन एक पिशवी रक्त दिले.राजाराम पाटील हे बी पॉझिटिव्ह रक्ताची पिशवी मिळत नसल्याने खुप परेशान होते ,मात्र हारून शेख यांनी रक्तदान करून एक पिशवी दिल्याने राजाराम पाटील यांच्या पत्नीला एकप्रकारे जीवदानच मिळाले असल्याने राजाराम पाटील व त्यांची पत्नी सविता पाटील व पाटील कुटुंबाने हारूण शेख यांचे मनापासून आभार मानले. हारून शेख यांनी माणूसकी अजूनही जीवंत आहे हे दाखवून दिले.रक्ताच्या एका एका थेंबासाठी तडफडत असलेल्या हिंदू महिलेला एका मुस्लिम युवकाने रक्तदान करून प्राण वाचविल्याने ‘आम्ही भारतीय एक आहोत’ हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात दिल्याने, हारून शेख यांच्या अभिमानास्पद कार्यामुळे कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक विनोद भगत, शिवव्याख्याते धनंजय कंटूले व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटूले,पत्रकार नितीन तौर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.