जालना- लक्ष्मण बिलोरे
– कोविड 19 महामारीच्या संकटात राज्यात अनेक पत्रकार आपले कर्तव्य पार पाडत असतांना कोरोनाची लागन होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.पत्रकार शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत.शहरात अनेक पत्रकार हे किरायाच्या घरात राहात असल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची ओळख आहे.मात्र वास्तविक पाहता पत्रकारांचे खूप हाल होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून ज्या पत्रकारांना स्वतःचे घर नाही किमान त्यांना स्वतःचे घर मिळावे याच अनुषंगाने एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने सिडकोचे मुख्य प्रशासक श्रीमती दिपा मुधोड-मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांची भूमिका महत्वाची असते.त्यास सन्मानाने जगता आले पाहिजे.सामाजिक हित जोपासणारे पत्रकार त्यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. विशेष बाब म्हणून ज्या पत्रकारांना स्वतःचे घर नाही त्यांना तात्काळ घर उपलब्ध करून द्यावे शासकीय नियमानुसार जे काही शुल्क असेल ते पत्रकार बांधव भरण्यास तयार आहेत.परंतू त्यांना घर देण्याची कारवाई तातडीने केली जावी अशी विनंती संघटनेचे संस्थापक रतन कुमार साळवे यांच्या नेतृत्त्वाखाली दिलेल्या निवेदनात करण्यात आली.या वेळी मुख्य प्रशासकाशी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश पवार,सल्लागार,रशपालसिंग अट्टल,उपाध्यक्ष बबनराव सोनवणे,जिल्हा संपर्कप्रमुख गजानन इंगळे,शेख फिरोज,यांची उपस्थिती होती.