अमळनेर : (एजाज़ गुलाबशाह )
येथील हशीमजी प्रेमजी संकुलात रात्री खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश दत्तू चौधरी उर्फ बापू चौधरी रा जुना पारधी वाडा वय-३५ येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीचा धारदार तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला आहे. हशीमजी प्रेमजी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर हा खून झाला आहे.खून कोणी केला हे अद्याप समोर आले नसून हा खून रात्री १ वाजे नंतर झाला असावा असि शक्यता वर्तवली जात आहे .सकाळी सफाई कामगार झाडलोट करण्यासाठी गेले असता सदर प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले असून शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सदर इसम बापू हे एक साधारण व्यक्ती असून मन मिळावू स्वभावाचे होते.हत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.