Home विदर्भ श्री. अमरभाऊ काळे यांचे अनेक ठिकाणी जल्लोषात स्वागत.

श्री. अमरभाऊ काळे यांचे अनेक ठिकाणी जल्लोषात स्वागत.

160

इकबाल शेख – वर्धा

आर्वी येथे स्वागत- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्री.अमरभाऊ काळे यांचे आर्वी येथे प्रथम आगमनानिमित्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.सायंकाळी सुमारे ५:३० वाजता अमरभाऊ काळे यांचे आगमन झाले व न्यायालया समोर तसेच रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.आर्वी येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष रॅली चे आयोजन सुद्धा करण्यात आले.ह्या रॅली ला चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन शुभेच्छांचा वर्षाव केला.शहरातील नागरिकांना मिठाई वाटण्यात आली.मी नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध राहील व नागरिकांचे प्रेम असेच वाढत राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे श्री.अमरभाऊ काळे म्हणाले व पक्षानी जबाबदारी दिल्या बद्दल आधक्ष्य श्रीमती.सोनिया जी गांधी व काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांचे आभार मानले.
कारंजा (घा.) येथे स्वागत-
कारंजा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्री.अमरभाऊ काळे यांचे जल्लोषात स्वागत केले.फुलांचा वर्षाव करण्यात आला व फटाके फोडण्यात आले.ह्यावेळी कारंजा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तळेगाव येथे स्वागत-
महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तळेगांव येथे अमरभाऊ काळे यांच्या प्रथम आगमनानिमित्य सवागत करण्यात आले.