Home विदर्भ नगर परिषद चे 31 आँगस्ट 2021 रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन

नगर परिषद चे 31 आँगस्ट 2021 रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन

171

रविंद्र साखरे

वर्धा –  काल दिनांक 30/08/2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू फेरीवाल्या कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या *हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.
त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 31/08/2021 नगर परिषद आर्वी जिल्हा वर्धा” तर्फे
*संपूर्ण प्रशासकीय कामकाज कडकडीत रित्या बंद ठेवण्या बाबत मा. मुख्याधिकारी नगर परिषद आर्वी , मा.उपविभागीय अधिकारी आर्वी, मा. तहसीलदार साहेब आर्वी मा. ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन आर्वी यांना संघटने तर्फे एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याबाबत निवेदन देण्यात आले व कठोर कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.
यावेळी संजय अंभोरे जिल्हाध्यक्ष अरून पंड्या जिल्हा महासचिव, गजानन वानखेडे तालुका अध्यक्ष, मा.रणजीत पवार उप मुख्याधिकारी, बंग सर, लेखापाल, भंडारकर सहा नगर रचनाकार, सौरभ निखारे, आशीष कितुकले भाग्यश्री कांडळकर, बोकडे मॅडम,क्षीरसागर मॅडम,अविनाश मानकर, रुपेश जळीत, सोनवाल साकेत राऊत अभियंता , सुनील आरीकर आरोग्य निरीक्षक, चोचमकर, आरोग्य व पा.पू अभियंता,किशोर नेवारे, प्रवीण रुईकर,राजेंद्र करहार, संतोष गजभिये, रुपेश माळोदे, वैशाली बुटले, ममता अवसरे, शिवाजी चिमोटे, रणजीत गोयर,दिगांबर साखरवाडे,प्रवीण सातारकर, अन्ना चौगुले, जगदीश निखाडे,अनिकेत गडपाडे व संपूर्ण नगर परीषद कर्मचारी वृंद निवेदन देत असताना उपस्थित होते…