Home पुणे विवाहितेची आत्महत्या; पाणीपुरीचे कारण

विवाहितेची आत्महत्या; पाणीपुरीचे कारण

686

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला केली अटक

सुशांत आगे / पुणे

‘मला न विचारता पाणीपुरी का आणली’ असा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

प्रतीक्षा सरवदे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर गहिनीनाथ अंबादास सरवदे (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना आंबेगाव पठार परिसरातील ‘सिंहगड व्हिला’मध्ये शनिवारी घडली. याबाबत प्रतीक्षाचे वडील प्रकाश पिसे (वय ५५, रा. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांचे जानेवारी २०१९ मध्ये लग्न झाले होते.
लग्नानंतर दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत होते. २८ ऑगस्टला गहिनीनाथने पत्नीसाठी पाणीपुरी आणली. मात्र, पत्नीने पाणीपुरी खाल्ली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. वादातून प्रतीक्षाने विष प्राशन केले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रतीक्षाचा पती घरगुती कारणातून, तसेच तिला पुण्याला नेत नसल्याच्या वादातून तिला शिवीगाळ व मारहाण करत होता. असे फिर्यादीत म्हटले आहे.