मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट,दि : २ :- परिवाराची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेला दिवाळी बोनस राज्य सरकारने काही वर्षापासून बंद केला आहे राज्य शासनाचा हा निर्णय पोलिसांवर अन्याय करणारा असून रक्षणकर्त्या पोलिसांचा दिवाळी बोनस सरकारने पूर्ववत सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने तहसीलदाराकडे लेखी निवेदन देऊन केली आहे
निवेदनात नमूद केले की पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या परिवाराची पर्वा न करता दिवस रात्र चोखपणे कर्तव्य बजावत असतात कोरोना सारख्या आपत्ती काळात तर पोलिसांनी सुट्टी न घेता दिवस रात्र सेवा बजावून नागरिकांच्या जीवाचे रक्षण केले सण, उत्सवकाळात कायदा व शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी नेहमी दक्ष असतात दंगलीच्या प्रसंगी पोलीसच नागरिकांच्या जिवाचे रक्षण करत असतात रक्षणकर्त्या पोलिसांना यापूर्वी दिवाळी बोनस देण्यात येत होते त्यातून त्यांची दिवाळी आनंदाने साजरी होत होती मात्र मागील काही वर्षापासून सरकारने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बोनस बंद केले आहे बोनस बंद झाल्यामुळे अन्याय झाल्याची भावना त्यांच्या कुटुंबियातून निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच दिवाळी बोनस पूर्ववत सुरू करून दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने महिला तालुकाध्यक्ष परवीन शेख यांनी तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर जयश्री भरणे रजिया शेख कविता गोणारकर विमलबाई पांडे मनीषा चौधरी शशिकला तलांडे ममता तलांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत