Home नांदेड नांदेड – माहूर पोलीसांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला केले जेरबंद.

नांदेड – माहूर पोलीसांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला केले जेरबंद.

278

मजहर शेख, नांदेड

माहूर पोलीसांची कौतुकास्पद
कामगिरी.

नांदेड/माहूर,दि : ३ :- 16 आॕगष्ट 2021 रोजी पोलीस स्टेशन माहुर येथे गु.र.नं.106/2021 कलम 376,392,323504, 506 भा.द.वि. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्वतः नामदेव रिठे साहेब हे करीत आहेत.
गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे आंबादास जगन्नाथ गवळी वय 40 वर्ष रा.गवळवाडी ता.पाटोदा जि.बिड हा फरार होता.सदर गुन्ह्यात आरोपी पाहीजे असल्याने नामदेव रिठे साहेब पोलीस निरीक्षक पो.स्टे.माहुर यांचे मार्गदर्शनाखाली साहेबराव सगरोळीकर यांनी सायबर क्राईम पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांचे मदतीने आरोपीचे मोबाईल टावर लोकेशन काढुन आरोपीचे लोकेशन मिळाल्याने सोबत पो.कॉ/पवनकुमार राऊत यांना घेऊन दिनांक 31.08.2021 जिल्हा अहमदनगर कडे खाजगी वाहनाने रवाना झाले. दिनांक 01.09.2021 रोजी सायंकाळी सदर आरोपीस तालुका जामखेड जि.अहमदनगर येथे ताब्यात घेतले.व पोलीस स्टेशन माहुर येथे आनुन आरोपीस माहुर कोर्ट समोर हजर केले असता मा.पवनकुमार तापडिया न्यायाधीश , न्यायालय माहूर यांनी आरोपीस 1 दिवसाचे पोलीस कोठडी मंजुर केली आहे.