गोर सेनेचे जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जालना – लक्ष्मण बिलोरे
जालना येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून मोरे,भीडे,मेढकर या आडनावाच्या व्यक्तींना विमुक्त जातीच्या प्रवर्गातील बंजारा म्हणुन देण्यात आलेली काही प्रमाणपत्र गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळालेली आहेत. विमुक्त जाती प्रवर्गातील मुळ बंजारा जातीत मोरे,भीडे,मेढकर अशी आडनावे नाहीत , जर ही आडनावे बंजारा जातीतील पोट जाती पैकी असेल तर ती पोटजात शासनाच्या विमुक्त जातीची जी यादी आहे त्या यादीत संबंधीत जातीचा समावशे आहे का, जर नसेल तर कोणत्या आधारावर या आडनावांच्या लोकांना बंजारा म्हणुन जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे?. कुमार मोरे विशाल हिम्मत,कुमार किशोर व्यंकट भीडे, कुमार अमित अशीष मेढकर,वावुलाल मोफतलाल मोरे ह्या व्यक्ती खरोखर वंजारा जातीचे आहेत की इतर जातीचे आहेत या बाबत उपविभागीय कार्यालयातून महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाला माहिती हवी आहे. त्यामुळे वरील विषयाला अनुसरून योग्य ती चौकशी करून बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन गोर सेने तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर सुभाष राठोड,सुधाकर जाधव,संदीप जाधव,विजय चव्हाण,शाम आढे शिवणारायन राठोड,जीवन राठोड,अमोल राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.