घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजातील बांधवांनी आंदोलने केली,लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले,बलिदान दिले.परंतु गेंड्याच्या कातडीचे सरकार निगरगट्ट बनले आहे.मराठा आरक्षण मिळावे म्हणून ४२ तरूणांनी आजवर आहुती दिली.बलिदान देणार्या मराठा समाजातील कुटुंबांना न्याय देणार का नाही.आजपासून उपचारही केले बंद नसता आम्ही राज्यभर उग्र आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत आहोत ,कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहिल. असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अंबड तहसील कार्यालयासमोर गेल्या ४ दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ४२ तरूणांनी आपल्या जीवाची आहुती दिली.
या मागास मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपले बलिदान या भावांनी दिले आहे.सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते.आज ४ वर्षे पूर्ण झाली आहेत तरी मुख्यमंत्री या कुटूंबाला न्याय देत नाहीत.
मुख्यमंत्र्यांना आणखी किती बळी पाहिजेत.आमरण उपोषणकर्ते ७ जण तब्येत बिघडल्याने अँडमिट आहेत.आता लवकरच मुख्यमंत्री यांनी या उपोषणकर्त्यांना न्याय द्या नसता आमची सहनशीलता संपली आहे.न्याय द्या नसता राज्यभर आम्ही उग्र आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत आहोत.आम्ही आता न्यायाची थोडे दिवस वाट बघणार नाहीतर राडाच सुरू करणार आहोत.सरकारला प्रेमाची भाषा समजणार नसेल तर आम्हाला उद्रेकाची दुसरीही भाषा येते.सरकारने तेवढे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी सरकारने घ्यावी,असा इशाराच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटिल यांनी दिला आहे.
म्हणून मनोज जरांगे पाटिल यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.मुख्यमंत्री साहेब मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्या कुटुंबियांचा अपमान करत आहेत.त्यांना न्याय देण्याऐवजी चेष्टा करत आहेत.मुख्यमंत्र्यांनी बलिदान देणार्या मराठा कुटूंबाला जोपर्यंत न्याय देणार नाहीत तोपर्यंत उपचार घेणारच नाही,असा टोकाचा निर्णयच मनोज जरांगे पाटिल यांनी घेतला आहे.